मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : वॉर्नरनं उजव्या हातानं बॅटींग करत मारला फोर, भुवनेश्वर कुमार पाहातच राहिला! VIDEO

IPL 2022 : वॉर्नरनं उजव्या हातानं बॅटींग करत मारला फोर, भुवनेश्वर कुमार पाहातच राहिला! VIDEO

डाव्या हातानं बॅटींग करणाऱ्या वॉर्नरनं (David Warner) भुवनेश्वर कुमारच्या बॉलवर उजव्या हातानं फोर मारला. दिल्लीच्या इनिंगमधील 18 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मे : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि रोव्हमन पॉवेलच्या (Rovman Powell) आक्रमक खेळाच्या जोरावर सनरायझर्स हैदाबादचा (SRH) 21 रननं पराभव केला आहे. दिल्लीचा या सिझनमधील पाचवा विजय आहे. या विजयासह ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या या टीमचे 10 पॉईंट्स झाले असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नरनं एक रिव्हर्स शॉट खेळत सर्वांचं लक्ष वेधलं.

डाव्या हातानं बॅटींग करणाऱ्या वॉर्नरनं भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) बॉलवर उजव्या हातानं फोर मारला. दिल्लीच्या इनिंगमधील 18 वी ओव्हर टाकण्यासाठी भुवनेश्वर आला होता. त्या ओव्हरचा पहिलाच बॉल भुवीनं वॉर्नरच्या पायापाशी टाकला. वॉर्नरला मोठा शॉट मारण्याची संधी मिळू नये म्हणून भुवीनं तसा बॉल टाकला होता. त्यावेळी वॉर्नरचा त्याचा स्टान्स बदलला आणि उजव्या हातानं बॅटींग करत फोर लगावला. त्याचा हा फोर पाहून भुवनेश्वर कुमारसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

डेव्हिड वॉर्नरनं त्याच्या जुन्या आयपीएल टीमच्या विरूद्ध 58 बॉलमध्ये नाबाद 92 रन केले. वॉर्नरने त्याच्या या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 12 फोर मारल्या. रोव्हमन पॉवेलने 35 बॉलमध्ये नाबाद 67 रनची वादळी खेळी केली. पॉवेलने 6 सिक्स आणि 3 फोर ठोकले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट आणि श्रेयस गोपाळ यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

IPL 2022 : 'फॉर्मची काळजी सोड, आणखी मुलांना जन्म दे,' वॉर्नरचा विराटला खास सल्ला!

दिल्लीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 186 रनपर्यंत पर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून फक्त निकोलस पूरनने (Nichoals Pooran) एकाकी झुंज दिली. पूरनने 34 बॉलमध्ये 62 रन केले. दिल्लीकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, याशिवाय शार्दुल ठाकूरला 2 विकेट घेण्यात यश आलं. एनरिच नॉर्किया, मिचेल मार्श आणि कुलदीप यादव यांना 1-1 विकेट मिळाली.

First published:

Tags: David warner, Delhi capitals, SRH