मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : दिल्लीसाठी 'करो या मरो', पंतने टॉस जिंकला, राजस्थानची बॅटिंग

IPL 2022 : दिल्लीसाठी 'करो या मरो', पंतने टॉस जिंकला, राजस्थानची बॅटिंग

Delhi Capitals

Delhi Capitals

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Delhi Capitals vs Rajasthan Royals) होत आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Shreyas

नवी मुंबई, 11 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Delhi Capitals vs Rajasthan Royals) होत आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्लीला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. दिल्लीने या सामन्यासाठी टीममध्ये दोन बदल केले आहेत. रिपल पटेलऐवजी ललित यादव आणि खलील अहमदऐवजी चेतन सकारियाची निवड झाली आहे. दुसरीकडे राजस्थानने शेमरन हेटमायरऐवजी रस्सी व्हॅनडर डुसेनला संधी दिली आहे.

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 11 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे दिल्लीने 11 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे.

Live Score पाहण्यासाठी क्लिक करा

दिल्लीची टीम

डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत, ललित यादव, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, चेतन सकारिया, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया

राजस्थानची टीम

यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, रस्सी व्हॅनडर डुसेन, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Rajasthan Royals