मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दिल्लीच्या गोलंदाजांना चोपत Jos Buttlerने IPLकारकिर्दीतील ठोकले चौथे शतक

दिल्लीच्या गोलंदाजांना चोपत Jos Buttlerने IPLकारकिर्दीतील ठोकले चौथे शतक

Jos Buttler

Jos Buttler

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर ( Jos Buttler) सध्या आपल्या सर्वोत्तम लयीत फलंदाजी करत आहे. बटलरने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात फटकेबाजी करून हंगामातील तिसरे तर आयपीएल (IPL) कारकिर्दीतील चौथे शतक ठोकले आहे

  • Published by:  Dhanshri Otari
मुंबई, 22 एप्रिल: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर ( Jos Buttler) सध्या आपल्या सर्वोत्तम लयीत फलंदाजी करत आहे. बटलरने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात फटकेबाजी करून हंगामातील तिसरे तर आयपीएल (IPL) कारकिर्दीतील चौथे शतक ठोकले आहे. बटलरने आपल्या या तुफानी खेळी 57 चेंडूंचा सामना केला. बटलरने आपल्या शतकी खेळीत दिल्लीच्या गोलंदाजांना चोपून काढलं आणि 8 चौकार व 8 षटकार खेचले. दिल्लीसमोर या खेळाडूने संथ सुरुवातीनंतर 10 चेंडू खेळून धडाकेबाज शैलीत फलंदाजीला सुरुवात केली. बटलरने दिल्लीकडून विकेट घेणारे गोलंदाज कुलदीप यादव आणि ललित यादव यांची झोप उडवतधावा गोळा करण्यास सुरुवात केली आणि आयपीएल 2022 चे तिसरे शतक झळकावले. आयपीएलचा जवळपास अर्धा प्रवास संपल्यानंतरही, जोस बटलर या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आघाडीवर आहे. यंदाच्या हंगामात त्याने 3 शतक ठोकले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 6 शतके झळकावली आहेत, तर विराट कोहली 5 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जोस बटलरशिवाय डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांनीही या लीगमध्ये 4-4 शतके झळकावली आहेत. मोसमातील सर्वाधिक शतकांसह दुसऱ्या स्थानावर जोस बटलरने या मोसमातील तिसरे शतक झळकावले आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 100 धावा केल्या होत्या, तर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 103 धावा केल्या होत्या. त्याचे हे दुसरे बॅक टू बॅक शतक आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक शतके 4 विराट कोहली 3 जॉस बटलर आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) आतापर्यंत दिल्लीने 6 सामने खेळत 3 सामने जिंकून 3 गमावले आहेत. तर राजस्थाननेही 6 सामने खेळून 4 सामने जिंकले असून 3 गमावले आहेत. त्यामुळे राजस्थानचं आव्हान दिल्लीसाठी अवघड असणार असून आहे. आजवरच्या इतिहासाचा विचार करता राजस्थान आणि दिल्ली संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 - 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज सामना कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष असून यंदाच्या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत.
First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022

पुढील बातम्या