मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनी कॅप्टन होताच चेन्नईचं नशीबही बदललं, CSK ने उडवला SRH चा धुव्वा

IPL 2022 : धोनी कॅप्टन होताच चेन्नईचं नशीबही बदललं, CSK ने उडवला SRH चा धुव्वा

एमएस धोनी (MS Dhoni) कर्णधार होताच चेन्नई सुपर किंग्स (CSK vs SRH) पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली आहे. आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा 13 रनने विजय झाला आहे.

  • Published by:  Shreyas

पुणे, 1 मे : एमएस धोनी (MS Dhoni) कर्णधार होताच चेन्नई सुपर किंग्स (CSK vs SRH) पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली आहे. आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा 13 रनने विजय झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 203 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 189/6 पर्यंतच मजल मारता आली. निकोलस पूरनने (Nicholas Pooran) 33 बॉलमध्ये नाबाद 64 रन केले, यामध्ये 6 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. याशिवाय केन विलियमसनने 47 आणि अभिषेक शर्माने 39 रनची खेळी केली. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर मिचेल सॅन्टनर आणि ड्वॅन प्रिटोरियस यांना 1-1 विकेट मिळाली.

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 202 रन केले. ऋतुराज गायकवाड 57 बॉलमध्ये 99 रन करून आऊट झाला, त्याने 6 फोर आणि 6 सिक्स ठोकले. तर डेवॉन कॉनवेने 55 बॉलमध्ये नाबाद 85 रनची खेळी केली. ऋतुराज आणि कॉनवे यांच्यात ओपनिंगसाठी 182 रनची पार्टनरशीप झाली. सीएसकेसाठी आयपीएल इतिहासातली ही सगळ्यात मोठी पार्टनरशीप होती.

आयपीएलच्या या सामन्याआधी रवींद्र जडेजाने सीएसकेची कॅप्टन्सी सोडली होती, त्यामुळे टीमने पुन्हा एकदा धोनीला कर्णधार केलं. यानंतरच्या पहिल्याच सामन्यात सीएसकेला यश मिळालं. यंदाच्या आयपीएलमधला 9 मॅचमधला सीएकेचा हा तिसरा विजय आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम नवव्या क्रमांकावर आहे.

सनरायजर्स हैदराबादने यंदा 9 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 10 पॉईंट्ससह हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, SRH