Home /News /sport /

IPL 2022 : मॅक्कलमचा KKR मधून राजीनामा, इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी निवड

IPL 2022 : मॅक्कलमचा KKR मधून राजीनामा, इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी निवड

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रॅण्डन मॅक्कलमला (Brendon McCullum) आणखी एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. मॅक्कलमला इंग्लंडच्या (England) टेस्ट टीमचा प्रशिक्षक करण्यात आलं आहे. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केकेआरचा (KKR) कोच आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत तो इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाची सूत्र स्वीकारण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा ...
    लंडन, 12 मे : न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रॅण्डन मॅक्कलमला (Brendon McCullum) आणखी एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. मॅक्कलमला इंग्लंडच्या (England) टेस्ट टीमचा प्रशिक्षक करण्यात आलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुढच्या 4 वर्षांसाठी मॅक्कलमसोबत करार केला आहे. ब्रॅण्डन मॅक्कलम सध्या आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केकेआरचा (KKR) कोच आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत तो इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाची सूत्र स्वीकारण्याची शक्यता आहे. ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारूण पराभवानंर क्रिस सिल्व्हरवूड यांनी इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय जो रूटही कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. रूटऐवजी आता बेन स्टोक्स इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे. इंग्लंडच्या टीमला मागच्या 9 टेस्टपैकी एकही जिंकता आलेली नाही, तर मागच्या 17 टेस्टपैकी त्यांना फक्त एकच टेस्ट जिंकता आली आहे. मॅक्कलम याआधी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सचाही कोच होता. इंग्लंड टीमसमोर असलेली आव्हानं मला माहिती आहेत, अशी प्रतिक्रिया मॅक्कलमने प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर दिली आहे. ब्रॅण्डन मॅक्कलम पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टीमचा कोच म्हणून काम करणार आहे. त्याच्याकडे 101 टेस्ट मॅचचा अनुभव आहे. 2019 साली मॅक्कलमने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजपासून मॅक्कलम नव्या भूमिकेत दिसेल. सीरिजची पहिली टेस्ट 2 जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होणार आहे. यासाठी इंग्लंडच्या टीमची पुढच्या आठवड्यात निवड होणार आहे. इंग्लंडची टीम जुलै महिन्यात भारताविरुद्ध एक टेस्ट खेळणार आहे, मागच्या वर्षी कोरोनामुळे सीरिजची पाचवी टेस्ट होऊ शकली नव्हती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे, पण आता दोन्ही टीमचे कर्णधार बदलले आहेत. विराटऐवजी रोहितकडे टीम इंडियाचं नेतृत्व आलं आहे. मॅक्कलमने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची टेस्ट खेळली होती. 12 शतकांच्या मदतीने त्याने 6,453 रन केले, यात 31 अर्धशतकंही होती. 302 रन हा त्याचा टेस्ट मधला सर्वाधिक स्कोअर होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: England, Ipl 2022, KKR

    पुढील बातम्या