मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : ...म्हणून बेन स्टोक्सला मागावी लागली 'बेबी एबी'ची माफी, मुंबई इंडियन्सचे चाहते संतापले!

IPL 2022 : ...म्हणून बेन स्टोक्सला मागावी लागली 'बेबी एबी'ची माफी, मुंबई इंडियन्सचे चाहते संतापले!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली असली तरी टीमचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) धमाकेदार कामगिरी केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली असली तरी टीमचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) धमाकेदार कामगिरी केली आहे. बेबी एबी (Baby AB) नावाने लोकप्रिय झालेल्या डेवाल्ड ब्रेविसने आयपीएलमध्येही एबी डिव्हिलयर्ससारखेच (Ab De Villiers) 360 डिग्री शॉट मारून चुणूक दाखवली आहे.

लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या (MI vs LSG) सामन्यात डेवाल्ड ब्रेविस तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला, यानंतर त्याने 13 बॉलमध्ये 31 रनची अफलातून खेळी केली, यात 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. डेवाल्ड ब्रेविसची ही खेळी पाहून सोशल मीडियावरूनही प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) यानेही डेवाल्ड ब्रेविसचं कौतुक केलं.

बेन स्टोक्सच्या ट्वीटनंतर लगेचच आवेश खानने डेवाल्ड ब्रेविसची विकेट घेतली, त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी बेन स्टोक्सवर निशाणा साधायला सुरूवात केली. डेवाल्ड ब्रेविसला बेन स्टोक्सची नजर लागल्याच्या प्रतिक्रिया मुंबईच्या चाहत्यांनी दिल्या.

मुंबईच्या चाहत्यांनी निशाणा साधायला सुरूवात केल्यानंतर बेन स्टोक्सने लगेचच माफीचं ट्वीट केलं. लखनऊविरुद्धच्या मॅचआधी ब्रेविसने पंजाबविरुद्धही धमाका केला होता. ब्रेविसने 25 बॉलमध्ये 49 रन केले, यात 5 सिक्स आणि 4 फोर होत्या.

डेवाल्ड ब्रेविसने मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये आक्रमक खेळी केली असली तरी याचा मुंबईला फायदा झालेला नाही. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सचा सगळ्या 6 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे, त्यामुळे आता प्ले-ऑफमध्ये पोहोचणंही त्यांच्यासाठी जवळपास अशक्य झालं आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians