Home /News /sport /

IPL Auction 2022 : या दोन खेळाडूंवर लागणार सर्वाधिक बोली, एक तर प्रत्येक मॅचला मारतो सिक्स

IPL Auction 2022 : या दोन खेळाडूंवर लागणार सर्वाधिक बोली, एक तर प्रत्येक मॅचला मारतो सिक्स

आयपीएल 2022 (IPL 2022) साठीचा खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. लिलावाला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे प्रत्येक टीमची कोणत्या खेळाडूवर बोली लावायची हे जवळपास निश्चित झालं आहे.

    मुंबई, 25 जानेवारी : आयपीएल 2022 (IPL 2022) साठीचा खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. लिलावाला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे प्रत्येक टीमची कोणत्या खेळाडूवर बोली लावायची हे जवळपास निश्चित झालं आहे. यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा ओपनर बेन मॅकडरमॉट (Ben Bcdermott) आणि वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर रोमारियो शेफर्ड (Somario Shepherd) यांच्यावर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. या दोन्ही खेळाडूंवर मागच्या मोसमात फ्रॅन्चायजींनी बोली लावली नव्हती. मॅकडरमॉटने बिग बॅश लीगच्या या मोसमात चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. पुढच्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठीही (Australia vs Sri lanka) त्याची ऑस्ट्रेलियन टीममध्ये निवड झाली आहे. तर दुसरीकडे शेफर्डने टी-20 च्या 20 इनिंगमध्ये 21 फोर आणि 21 सिक्स मारल्या आहेत. याशिवाय त्याने 36 इनिंगमध्ये 49 विकेटही घेतल्या. 27 वर्षांच्या बेन मॅकडरमॉटने (Big Bash League) बिग बॅश लीगच्या या मोसमात सर्वाधिक 577 रन केले. त्याने 153.86 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. मॅकडरमॉटकडे 17 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 2 वनडे मॅचचा अनुभव आहे. आयपीएल लिलावासाठी आपण उत्सुक असल्याची प्रतिक्रिया मॅकडरमॉटने दिली. मागच्या वर्षी रिले मेरेडिथला मोठी रक्कम मिळाली, तेव्हा आम्ही न्यूझीलंडमध्ये क्वारंटाईन होतो. हॉटेल रूममधून आम्ही त्याला बघत होतो, असं मॅकडरमॉट म्हणाला. मागच्या वर्षी पंजाब किंग्सने (Punjab Kings) रिले मेरेडिथला 8 कोटी आणि झाय रिचर्डसनला 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. या दोघांनीही मागच्या बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांच्यावर एवढी मोठी बोली लावण्यात आली. दुसरीकडे शेफर्डने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मध्ये 28 बॉलमध्ये 44 रनची नाबाद खेळी केली. 27 वर्षांच्या या ऑलराऊंडरने इनिंगमध्ये 5 सिक्स आणि एक फोर मारली. याशिवाय त्याने बॉलिंगमध्ये एक विकेटही घेतली. आयपीएल लिलावासाठी शेफर्डची बेस प्राईज 75 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या