Home /News /sport /

IPL 2022 Auction : दिल्ली सोडणार मुंबईचा क्रिकेटपटू, लिलावात लागणार 20 कोटींची बोली, 7 टीमची नजर!

IPL 2022 Auction : दिल्ली सोडणार मुंबईचा क्रिकेटपटू, लिलावात लागणार 20 कोटींची बोली, 7 टीमची नजर!

आयपीएल 2022 साठीचा लिलाव (IPL 2022 Auction) लवकरच होणार आहे. त्याआधी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) साथ सोडण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठीचा लिलाव (IPL 2022 Auction) लवकरच होणार आहे. याआधी प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना कायम ठेवू शकते, तर दोन नव्या टीम लिलावाआधी तीन खेळाडूंना विकत घेऊ शकतात. यानंतर जानेवारी महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) साथ सोडण्याची शक्यता आहे. आयपीएल 2021 च्या पहिल्या राऊंडमध्ये दुखापतीमुळे श्रेयस अय्यर खेळू शकला नव्हता, तेव्हा ऋषभ पंतला (Rishabh Pant) दिल्लीची कॅप्टन्सी देण्यात आली. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडवेळी श्रेयस अय्यरचं टीममध्ये पुनरागमन झालं, पण दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतलाच कॅप्टन ठेवलं. पंतच्या नेतृत्वात दिल्लीची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली होती, त्यामुळे आता पंतलाच कॅप्टन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या टीमचा कॅप्टन होण्यासाठी श्रेयस अय्यर दिल्लीच्या टीमची साथ सोडण्याच्या विचारात आहे, असं सांगितलं जात आहे. अय्यरने दिल्लीची टीम सोडली तर त्याला लिलावात 20 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. एक दोन नाही तर तब्बल 7 टीम श्रेयस अय्यरवर बोली लावू शकतात. आयपीएल 2022 मध्ये 8 नाही तर 10 टीम मैदानात उतरणार आहेत. श्रेयस अय्यर मधल्या फळीतला उत्कृष्ट बॅटर आहे. याशिवाय आपल्या नेतृत्वात अय्यरने 2020 साली दिल्लीला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. दिल्लीशिवाय मुंबई आणि आरसीबीचीच मधली फळी मजबूत आहे. आयपीएलच्या इतर पाच टीम या मोसमात मधल्या फळीच्या खेळाडूंमुळे त्रस्त होत्या. श्रेयस अय्यरवर केकेआर, पंजाब, राजस्थान, हैदराबाद, चेन्नई याशिवाय दोन नव्या टीमचंही लक्ष असेल. कारण यातल्या प्रत्येक टीमला मधल्या फळीतल्या चांगल्या बॅटरची गरज आहे. केकेआर आणि पंजाबच्या टीमला आयपीएल 2021 मध्ये चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्यांच्या मधल्या फळीने निराशाजनक कामगिरी केली होती. ईयन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक खराब फॉर्ममध्ये होते. तर पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अग्रवालने अनेक सामन्यांमध्ये शतकी पार्टनरशीप केली, पण मधल्या फळीने निराशा केल्यामुळे त्यांचा 3 ते 4 मॅचमध्ये निसटता पराभव झाला. या कारणामुळे लागणार मोठी बोली राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रिकी फास्ट बॉलर क्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण त्याची कामगिरी खराब झाली. याशिवाय पंजाबने झाय रिचर्डसनला 14 कोटी रुपयांना, केकेआरने पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपयांना, सीएसकेने कृष्णप्पा गौतमला 9.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्यामुळे श्रेयस अय्यरवर या लिलावात मोठी बोली लागू शकते. श्रेयस अय्यरला टीममध्ये घेतलं तर मधल्या फळीतला चांगला खेळाडूच नाही तर टीमला कॅप्टनही मिळणार आहे. श्रेयस अय्यरने केलं सिद्ध आयपीएल 2021 मध्ये दुखापतीमुळे श्रेयस अय्यर फक्त 8 मॅच खेळू शकला होता, तरीही त्याने 35 च्या सरारीने 175 रन केले. याआधी 2018 पासून 2020 पर्यंत लागोपाठ तीन सिझन त्याने 400 पेक्षा अधिक रन केले. 2020 साली श्रेयसने 519 रन केले होते, यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलच्या एका मोसमातली अय्यरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एकूण आयपीएलच्या 83 मॅचमध्ये त्याने 32 च्या सरासरीने 2,375 रन केले, यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे. एकूण टी-20 करियरमध्ये त्याने 154 इनिंगमध्ये 32 च्या सरासरीने 4,150 रन केले. यामध्ये 2 शतकं आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. 129 च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही अय्यरची टीम इंडियात निवड झाली आहे. लिस्ट एमध्ये अय्यरने 8 शतकं आणि 25 अर्धशतकं केली आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022 auction, Shreyas iyer

    पुढील बातम्या