मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन करताच, शॉच्या गर्लफ्रेंडने दिली खास कमेंट

IPL 2022 : पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्सने रिटेन करताच, शॉच्या गर्लफ्रेंडने दिली खास कमेंट

Prithvi Shaw

Prithvi Shaw

आयपीएल 2022 (IPL2022 Auction ) मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 3 खेळाडूंसह पृथ्वी शॉलादेखील (prithvi shaw) रिटेन केलं आहे.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 (IPL2022 Auction )पूर्वी कोणते खेळाडू रिटेन होणार याची उत्सुरकता आता संपली आहे. प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी होती. दिल्ली कॅपिटल्सनेही 4 खेळाडूंची निवड केली असून क्रिकेटर पृथ्वी शॉचादेखील (Prithvi Shaw ) समावेश आहे. त्याच्या या निवडीचा खरा आनंद त्याची कथित गर्लफ्रेंड प्राची सिंह (Prachi Singh) हिला झाला आहे. तिने तिची ही भावना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केली आहे.

मंगळवारी, जेव्हा शॉला आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सने त्याला उर्वरित 3 खेळाडूंसह कायम ठेवले तेव्हा प्राची खूप आनंदी दिसत होती. सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करताना तिने शॉचा एक फोटोही पोस्ट केला आहे.

प्राचीने आपल्या इंस्टाग्राम स्टेटरमध्ये शॉचा फोटो पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शॉचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ती मस्ती करताना दिसत आहे. प्राची सिंगने यापूर्वीच पृथ्वी शॉचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे.

दोघांच्या अफेअरची चर्चा

सुत्रांच्या माहितीनुसार, प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ सतत एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही याबाबत उघडपणे काहीही सांगितले नसले तरी, पृथ्वी आणि प्राचीच्या सोशल मीडियावरील हालचालींवरून त्यांच्या जवळीकीचा अंदाज येतो. प्राची सिंहचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबईत झाला. प्राची खूप सुंदर आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

टीव्ही शोमध्ये काम केले आहे

पृथ्वी शॉची कथित गर्लफ्रेंड प्राची सिंगने मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. प्राची सिंगने 2019 मध्ये मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. कलर्स टीव्ही शो 'उडान'मध्ये प्राची सिंहने वंशिका शर्माची महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्राची सिंग ही एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगनाही आहे. प्राची सिंग अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जे चाहत्यांना खूप आवडते.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Prithvi Shaw