मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /काय? IPL 2022 मध्ये CSK कडून खेळणार नाही धोनी! कारण पाहून बसेल धक्का

काय? IPL 2022 मध्ये CSK कडून खेळणार नाही धोनी! कारण पाहून बसेल धक्का

आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा ऑक्शन लवकरच पार पडणार आहे. एकीकडे नव्या नियमानुसार कोणते खेळाडू कायम ठेवायचे, याबाबतचा विचार प्रत्येक टीम करत असतानाच एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सला (CSK) धक्का दिला आहे.

मुंबई, 1 नोव्हेंबर : आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा ऑक्शन लवकरच पार पडणार आहे. याआधी आयपीएलने खेळाडूंना रिटेन करण्याबाबतचा नियम जाहीर केला आहे. प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना कायम ठेवू शकतात, तर आयपीएलच्या दोन नव्या टीम लिलावाआधी प्रत्येकी 3 खेळाडू थेट विकत घेऊ शकतात. एकीकडे नव्या नियमानुसार कोणते खेळाडू कायम ठेवायचे, याबाबतचा विचार प्रत्येक टीम करत असतानाच एमएस धोनीने (MS Dhoni) धक्का दिला आहे. चेन्नईच्या टीमने (CSK) आपल्याला रिटेन करू नये, असं धोनीला वाटत आहे. चेन्नईच्या टीमने आपल्यावर पैसे बरबाद करू नये, असं धोनी म्हणाल्याची प्रतिक्रिया टीमचे मालक एन श्रीनिवासन (N Srinivasan) यांनी दिली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएल 2021 जिंकली. चेन्नईने आतापर्यंतच्या चारही आयपीएल एमएस धोनीच्या नेतृत्वात जिंकल्या.

Editorji सोबत बोलताना एन श्रीनिवासन म्हणाले, 'धोनी निष्पक्ष व्यक्ती आहे. टीमने आपल्याला रिटेन करून पैसे फुकट घालवू नये असं त्याला वाटतं, पण धोनीने पुढच्या मोसमात आमच्या टीमकडून खेळावं, असं मला वाटतं. टीमच्या निर्णयाला मी कोणत्याही पद्धतीने प्रभावित करत नाही.'

IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल, 4 खेळाडू रिटेन करता येणार पण... BCCI ची घोषणा

धोनीची निराशाजनक कामगिरी

एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली असली तरी त्याची बॅटिंग मात्र अपयशी ठरली. 16 मॅचमध्ये 16 च्या सरासरीने धोनीने फक्त 114 रन केले. नाबाद 18 रन धोनीची सर्वोत्तम खेळी होती. या मोसमात धोनीचा स्ट्राईक रेटही 107 चा होता. धोनी सध्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेंटर आहे.

10 टीममध्ये 34 सामने

आयपीएल 2022 मध्ये 8 ऐवजी 10 टीम खेळतील, त्यामुळे 60 ऐवजी 74 सामने होतील. असं असलं तरी मागच्या मोसमाप्रमाणेच प्रत्येक टीम 14-14 मॅच खेळणार आहेत. आयपीएल 2022 साठीचा लिलाव डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आणि चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. पुढच्या मोसमात लखनऊ आणि अहमदाबादच्या नव्या टीम मैदानात उतरणार आहे.

IPL 2022 : Hardik कॅप्टन होणार! Mumbai Indians ने सोडलं तर ही टीम देणार साथ

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction