• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2022 Auction : लखनऊ आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम, RPSG ग्रुपने दिलेली किंमत ऐकून बसेल शॉक!

IPL 2022 Auction : लखनऊ आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम, RPSG ग्रुपने दिलेली किंमत ऐकून बसेल शॉक!

आयपीएलच्या (IPL Auction 2022) दोन नव्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊच्या (Lucknow) टीम पुढच्या मोसमापासून मैदानात उतरणार आहेत.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL Auction 2022) दोन नव्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊच्या (Lucknow) टीम पुढच्या मोसमापासून मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 झाली आहे. आरपीएसजी ग्रुपने (RPSG) लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली, तर सीव्हीसी कॅपिटलला (CVC Capital) अहमदाबादची टीम 5,166 कोटी रुपयांना मिळाली. याआधी RPSG ग्रुपकडे  रायजिंग पुणे सुपरजायंट्स या टीमची मालकीही होती. 2016 आणि 2017 साली जेव्हा चेन्नई आणि राजस्थानच्या टीमवर बंदीची कारवाई करण्यात आली होती, तेव्हा पुणे आणि गुजरात लायन्स या टीम आयपीएलमध्ये खेळल्या होत्या. लखनऊची टीम सगळ्यात महाग आरपीएसजी ग्रुपने लखनऊच्या टीमवर यशस्वी बोली लावली. या टीमसाठी कंपनीने तब्बल 7090 कोटी रुपये मोजले, याचसोबत लखनऊची टीम आयपीएल इतिहासातली सगळ्यात महागडी टीम झाली आहे. आयपीएल टीमची किंमत लखनऊ- 950 मिलियन युएस डॉलर अहमदाबाद- 710 मिलियन युएस डॉलर पुणे वॉरियर्स- 370 मिलियन युएस डॉलर कोची टस्कर्स- 333 मिलियन युएस डॉलर मुंबई इंडियन्स- 111.9 मिलियन युएस डॉलर आरसीबी- 111.6 मिलियन युएस डॉलर डेक्कन चार्जस- 107 मिलियन युएस डॉलर चेन्नई सुपर किंग्स- 91 मिलियन युएस डॉलर दिल्ली कॅपिटल्स- 84 मिलियन युएस डॉलर सनरायजर्स हैदराबाद- 79.5 मिलियन युएस डॉलर पंजाब किंग्स- 76 मिलियन युएस डॉलर कोलकाता नाईट रायडर्स- 75.1 मिलियन युएस डॉलर राजस्थान रॉयल्स- 67 मिलियन युएस डॉलर अहमदाबाद, लखनऊ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी आणि इंदूर या सहा शहरांमध्ये आयपीएलच्या नव्या टीमसाठीची स्पर्धा होती. प्रसिद्ध फूटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे मालक, अडानी ग्रुप (Adani Group), कोटक ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा या कंपन्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. एमएस धोनीचा (MS Dhoni) मॅनेजर असलेल्या अरुण पांडे यांच्या रिठी स्पोर्ट्स या कंपनीने उद्योगपती आनंद पोदार यांच्या कंपनीसाठी कटकची टीम विकत घेण्यात रस दाखवला, पण बिडिंग करण्यासाठी रिठी स्पोर्ट्सला उशीर झाला, त्यामुळे त्यांचं टेंडर स्वीकारण्यात आलं नाही, असं वृत्त आहे.
  Published by:Shreyas
  First published: