मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Auction 2022 ची तारीख ठरली, दोन दिवस चालणार लिलाव!

IPL Auction 2022 ची तारीख ठरली, दोन दिवस चालणार लिलाव!

आयपीएल 2022 (IPL Auction 2022) चा लिलाव दोन टीम वाढल्यामुळे आणखी मोठा होणार आहे, पण बीसीसीआय (BCCI) लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबादच्या (Ahmedabad) टीमना खेळाडू विकत घेण्यासाठी योग्य वेळ देऊ इच्छित आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 20 डिसेंबर : आयपीएल 2022 (IPL Auction 2022) चा लिलाव दोन टीम वाढल्यामुळे आणखी मोठा होणार आहे, पण बीसीसीआय (BCCI) लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबादच्या (Ahmedabad) टीमना खेळाडू विकत घेण्यासाठी योग्य वेळ देऊ इच्छित आहे. आधीच्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी नोव्हेंबर महिन्यात जाहीर केली. बीसीसीआयने लिलावाच्या तारखांची अजूनही घोषणा केली नाही, कारण अहमदाबादची मालकी असणाऱ्या सीव्हीसी कॅपिटलबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. सीव्हीसी कॅपिटलने 5600 कोटी रुपयांमध्ये अहमदाबादची टीम विकत घेतली होती, पण कंपनीचे बेटिंग कंपनीशी संबंध असल्यामुळे हा करार वादात सापडला आहे.

क्रिकेट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलचा लिलाव फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँगलोर किंवा हैदराबादमध्ये होईल. तसंच 2018 प्रमाणे यंदाही लिलाव दोन दिवसांचा असेल. अहमदाबाद आणि लखनऊच्या टीमसाठी खेळाडू विकत घेण्याची वेळ 1 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. दोन्ही टीम प्रत्येकी 3-3 खेळाडू विकत घेऊ शकतात, यासाठी त्यांना 33 कोटी रुपये खर्च करावे लागतील. पहिल्या पसंतीच्या खेळाडूला 15 कोटी, दुसऱ्या पसंतीच्या खेळाडूला 11 कोटी आणि तिसऱ्या पसंतीच्या खेळाडूला 7 कोटी रुपये किंमत मोजावी लागेल. तसंच या तीनपैकी दोन खेळाडू भारतीय असले पाहिजेत.

लखनऊच्या टीमने कोच म्हणून एण्डी फ्लॉवर आणि मेटंर म्हणून गौतम गंभीरची नियुक्ती केली आहे. फ्लॉवर पंजाब किंग्ससोबत सहाय्यक कोच म्हणून दोन मोसम होता. तसंच पंजाबचा मागच्या दोन मोसमात कर्णधार असलेला केएल राहुलही लखनऊकडून खेळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने आयपीएल 2022 च्या तारखा ठरवलेल्या नसल्या तरी 2 एप्रिलपासून चेन्नईमध्ये आयपीएलला सुरूवात होईल, असं बीसीसीआयने आयपीएल टीमना सांगितलं आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction