मुंबई, 14 जुलै : आयपीएलचा लिलाव (IPL Auction) फक्त टीम मजबूत करण्यासाठीच नसतो तर यामुळे चाहत्यांचंही मनोरंजन होतं. आयपीएलच्या 2022 (IPL 2022) मोसमासाठीही मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये प्रत्येक टीमला नव्याने खेळाडूंची बांधणी करावी लागणार आहे. लिलावाआधी प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडूंना कायम ठेवू शकते. तर उरलेल्या सगळ्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार प्रत्येक टीमला तीन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू किंवा दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने आरसीबीच्या (RCB) चार खेळाडूंची निवड केली आहे, ज्यांना टीममध्ये कायम ठेवलं जाईल. ब्रॅड हॉगच्या मते आरसीबी विराट कोहली (Virat Kohli), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांना कायम ठेवेल. ब्रॅड हॉगने आश्चर्यकारकरित्या एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) याला या यादीत ठेवलं नाही.
'मी अंतिम निर्णय घ्यायच्या आधी एबी डिव्हिलियर्स आणखी किती काळ खेळणार आहे, याची माहिती करून घेईन. जेमिसनही (Kyle Jamieson) बाहेर जाईल. आजच्या परिस्थितीमध्ये परदेशी खेळाडूंमध्ये गुंतवणूक करणं धोकादायक आहे,' असं हॉग म्हणाला.
4 year window to invest in players. Kohli Siraj Chahal Padikkal Keeping locals vital. I would find out on how long AB De Villiers wants to play to before I make the final decision. Jamieson would be looked out to. Overseas player investment to risky today though. https://t.co/z5bycmioie
— Brad Hogg (@Brad_Hogg) July 12, 2021
आरसीबीने एबी डिव्हिलियर्स आणि काईल जेमिसन या दोघांवर मोठी गुंतवणूक केली आहे, तरीही हॉगने दोघांना बाहेर केल्यामुळे चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच अनेकांनी युझवेंद्र चहलऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा पर्यायही उपलब्ध असल्याचं हॉगला सांगितलं. यावरही हॉगने प्रत्युत्तर दिलं.
Contemplating him for his all-round ability in front of Chahal. Maybe a better option as you have a large pool of spinners to choose from in the auction and all-rounders are harder to get. #RCB #IPL https://t.co/NVa4qAL7VO
— Brad Hogg (@Brad_Hogg) July 12, 2021
'चहलसमोर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हा ऑलराऊंडर म्हणून चांगला पर्याय आहे. कारण लिलावात निवडण्यासाठी तुमच्याकडे बरेच स्पिनर आहेत. ऑलराऊंडरची निवड करणं मात्र कठीण आहे,' असं हॉगने सांगितलं.
आयपीएल 2021 चा मोसम अजून पूर्ण झाला नाही. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये आयपीएलच्या उरलेल्या मॅच होणार आहेत. या सामन्यांमधली ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), काईल जेमिसन आणि एबी डिव्हिलियर्स यांची कामगिरीही पुढच्या लिलावासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Ipl, RCB, Virat kohli