मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 Auction: BCCI अडचणीत, जानेवारीमधला लिलावही संकटात, जाणून घ्या कारण

IPL 2022 Auction: BCCI अडचणीत, जानेवारीमधला लिलावही संकटात, जाणून घ्या कारण

बीसीसीआय (BCCI)आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावाची योजना आखत होते, पण आता भारतीय क्रिकेट बोर्ड अडचणीत सापडलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 डिसेंबर : बीसीसीआय (BCCI)आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावाची योजना आखत होते, पण आता भारतीय क्रिकेट बोर्ड अडचणीत सापडलं आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याआधी आयपीएल 2022 चा लिलाव होणार नाही, अशी शक्यता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. इनसाईड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार फ्रॅन्चायजींना लिलाव जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, असं अनौपचारिकरित्या सांगण्यात आलं होतं. पण अहमदाबाद फ्रॅन्चायजीच्या संबंधित मुद्द्यांचा अंतिम निर्णय व्हायला उशीर झाल्यामुळे लिलाव जानेवारी महिन्याच्या अखेरीस होऊ शकतो.

बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं की अहमदाबाद फ्रॅन्चायजीचे माल सीव्हीसी कॅपिटल यांच्याबाबत नियुक्त केलेली विशेष समितीने अजून निर्णय दिलेला नाही. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत लिलावाची तारीख निश्चित केली जाणार नाही.

याशिवाय लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) या दोन्ही टीमना लिलावाआधी त्यांचे तीन खेळाडू निवडण्यासाठी योग्य वेळही द्यावा लागेल. जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याआधी लिलाव होईल, असं आम्हाला वाटत नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

आयपीएलच्या जुन्या 8 टीमनी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला मागच्याच आठवड्यात दिली. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबादशिवाय लखनऊ या दोन टीम पदार्पण करणार आहेत. लखनऊच्या टीमने एण्डी फ्लॉवर कोच आणि गौतम गंभीर (gautam gambhir) मेंटर असतील, असं घोषित केलं आहे. सध्याच्या 8 टीमने एकूण 27 खेळाडूंना रिटेन केलं आहे, तर अनेक बड्या खेळाडूंना सोडून देण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) तर आरसीबीने (RCB) युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) रिटेन केलं नाही.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction