मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 मध्ये दिल्ली कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? अश्विनने दिली मोठी Update

IPL 2022 मध्ये दिल्ली कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार? अश्विनने दिली मोठी Update

आयपीएल 2022 साठी (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहे, याबाबत टीमचा ऑफ स्पिनर आर.अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची माहिती दिली आहे.

आयपीएल 2022 साठी (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहे, याबाबत टीमचा ऑफ स्पिनर आर.अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची माहिती दिली आहे.

आयपीएल 2022 साठी (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहे, याबाबत टीमचा ऑफ स्पिनर आर.अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Published by:  Shreyas

कानपूर, 23 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहे, याबाबत टीमचा ऑफ स्पिनर आर.अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची माहिती दिली आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली त्याला आणि श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) रिटेन करणार नसल्याचे संकेत अश्विनने दिले आहेत. अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर ही प्रतिक्रिया दिली. मागच्या दोन मोसमांपासून अश्विन दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता, याआधी तो पंजाब किंग्सकडे होता, तसंच त्याने पंजाबच्या टीमचं नेतृत्वही केलं.

'दिल्लीची टीम मला रिटेन करणार नाही, कारण त्यांनी मला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असता, तर याबाबत मला सांगण्यात आलं असतं,' असं अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला. अश्विनने श्रेयस अय्यरबद्दलही असंच वक्तव्य केलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीची टीम आयपीएल 2020 फायनल खेळली, यानंतर आयपीएल 2021 च्या पहिल्या राऊंडआधी इंग्लंडविरुद्धच्या सीरिजदरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे तो जवळपास 6 महिने क्रिकेटपासून लांब होता. त्याच्या गैरहजेरीमध्ये ऋषभ पंतला (Rishabh Pant) नेतृत्व देण्यात आलं. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्येही अय्यरच्या पुनरागमनानंतर पंतकडेच टीमचं नेतृत्व कायम राहिलं.

दिल्ली कॅपिटल्स तीनपेक्षा जास्त खेळाडूंना रिटेन करणार नाही, यामध्ये ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि एनरिच नॉर्किया यांचा समावेश असेल, असं अश्विनला वाटत आहे. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या टीम जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे यापैकी एका टीमचा कॅप्टन होण्यासाठी अय्यर दिल्लीची साथ सोडू शकतो.

बीसीसीआयने आयपीएल 2022 च्या लिलावाआधी खेळाडूंना रिटेन करण्याबाबतच्या नियमांची घोषणा केली आहे. जुन्या 8 टीम 4 खेळाडूंना रिटेन करू शकतात, यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू असतील. 2 नव्या टीमना लिलावाआधी 2 भारतीय आणि एक परदेशी असे एकूण प्रत्येकी 3 खेळाडू रिटेन करता येतील.

आर.अश्विन आयपीएल 2020 साली पंजाब किंग्सकडून दिल्लीच्या टीममध्ये 7.6 कोटी रुपयांमध्ये सामील झाला. दिल्लीमध्ये आल्यानंतर अश्विनची कामगिरी सुधारली. 2020 साली त्याने 15 सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या, तर यावर्षी त्याला 13 सामन्यांमध्ये 7 विकेट मिळाल्या. आयपीएलमधल्या चांगल्या कामगिरीच्या आधारावर त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाली. साडेचार वर्षांनंतर अश्विनने मर्यादित ओव्हरच्या भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनला 3 सामन्यांमध्ये 6 विकेट मिळाल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्येही त्याने 2 मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Ipl 2022 auction, R ashwin, Shreyas iyer