मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : Arjun Tendulkar चं आयपीएल पदार्पण होणार, रोहितने सांगितला मुंबईचा गेम प्लान!

IPL 2022 : Arjun Tendulkar चं आयपीएल पदार्पण होणार, रोहितने सांगितला मुंबईचा गेम प्लान!

सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अजूनही आयपीएल (IPL 2022) खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल 2021 पासून अर्जुन मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमचा भाग आहे.

मुंबई, 17 मुंबई : सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अजूनही आयपीएल (IPL 2022) खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल 2021 पासून अर्जुन मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमचा भाग आहे. आयपीएल 2022 मध्ये हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने आणखी दोन युवा खेळाडूंना संधी दिली. मयंक मार्कंडे (Mayank Markande) आणि संजय यादव (Sanjay Yadav) हे दोन खेळाडू या मोसमातला पहिलाच सामना खेळत आहेत. या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईची टीम प्ले-ऑफच्या रेसमधून आधीच बाहेर झाली आहे, तर दुसरीकडे हैदराबादला 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.

आयपीएलच्या या मोसमात मुंबईने आतापर्यंत 22 खेळाडूंना संधी दिली आहे, तर आर्यन जुयाल, राहुल बुद्धी आणि अर्जुन तेंडुलकर हे तीनच खेळाडू अजूनही पहिल्या मॅचच्या प्रतिक्षेत आहेत. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर रोहितने पुढच्या मोसमासाठी आम्ही वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली, तसंच पुढच्या सामन्यातही काही नव्या खेळाडूंना मैदानात उतरवलं जाईल, असं रोहित म्हणाला. रोहितच्या या वक्तव्यामुळे अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळेल, असं बोललं जात आहे.

मुंबईचा शेवटचा सामना दिल्लीविरुद्ध

मुंबई इंडियन्सचा या मोसमातला अखेरचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. वानखेडे स्टेडियमशी सचिन तेंडुलकरचंही खास नातं आहे. याच मैदानात सचिनने वर्ल्ड कप जिंकला होता, त्यामुळे अर्जुनसाठीही या मैदानात पदार्पण करणं खास असेल. मुंबईविरुद्धची ही मॅच दिल्लीसाठीही खास असेल, कारण 16 पॉईंट्सवर जाऊन प्ले-ऑफ गाठण्याचं आव्हान दिल्लीपुढे आहे.

स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना हरभजन सिंग यानेही अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Arjun Tendulkar, Ipl 2022, Mumbai Indians