मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : अहमदाबादची टीम आयपीएल खेळणार नाही? समोर आली मोठी Update

IPL 2022 : अहमदाबादची टीम आयपीएल खेळणार नाही? समोर आली मोठी Update

आयपीएलची (IPL 2022) नवीन टीम अहमदाबाद (Ahmedabad) हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन या खेळाडूंना विकत घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे, पण आता अहमदाबादची टीम आयपीएल खेळणार का नाही? यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 नोव्हेंबर : आयपीएलची (IPL 2022) नवीन टीम अहमदाबाद (Ahmedabad) हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन या खेळाडूंना विकत घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे, पण आता अहमदाबादची टीम आयपीएल खेळणार का नाही? यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. इनसाईड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार इरलिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला अहमदाबादची टीम चालवायला देण्याबाबत परवानगी दिलेली नाही. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादच्या टीमला विकत घेतलं होतं. इरलिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (Irelia Company Pte Ltd) सीव्हीसी कॅपिटलची (CVC Capital) पार्टनर आहे.

सीव्हीसी कॅपिटलने 25 ऑक्टोबरला झालेल्या लिलावात अहमदाबादच्या टीमला 5,625 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यानंतर लगेचच सीव्हीसी कॅपिटलच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. सीव्हीसी कॅपिटलची एका बेटिंग कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याचा दावा केला जातोय, याच कारणामुळे बीसीसीआय सीव्हीसी कॅपिटलला अहमदाबादची फ्रॅन्चायजी देईल का नाही, याबाबत शंका उपस्थित होत होती. अजूनही बीसीसीआयने परवानगी दिली नसल्यामुळे अहमदाबादच्या सहभागाबाबतचा संशय आणखी वाढला आहे.

आयपीएलच्या 8 टीमना खेळाडू रिटेन करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची तारीख देण्यात आली आहे. प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकते. यानंतर आयपीएलच्या दोन नव्या टीम अहमदाबाद आणि लखनऊ यांना 25 डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त 3-3 खेळाडू विकत घेता येणार आहेत. यानंतर आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

कोण आहे सीव्हीसी कॅपिटल?

सीव्हीसी कॅपिटल युकेमधली इनव्हेस्टमेंट फर्म आहे. या कंपनीने नुकतेच ला लिगामध्ये 10 टक्के मीडिया राईट्स विकत घेतले आहेत. याशिवाय फॉर्म्युला वन आणि रग्बी टीमही सीव्हीसी कॅपिटलच्या नावावर आहे.

'आऊटलुक'नं दिलेल्या वृत्तानुसार CVC कॅपिटलनं बेटींग आणि जुगार कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. 2013 साली उघडकीस आलेल्या बेटींग आणि फिक्सिंग प्रकरणामुळे आयपीएलची यापूर्वीच बदनामी झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सापडल्यानं त्यांच्यांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

आता त्यापाठोपाठ बेटींग आणि जुगारातील उद्योगात मोठी गुंतवणूक असलेल्या कंपनीला आयपीएल फ्रँचायझी देण्यात आल्यानं बीसीसीआयच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकाराला भारतीय कायद्यानुसार बंदी आहे. लिलावापूर्वी झालेल्या पडताळणीमध्ये सीव्हीसी ग्रुपचे हे संबंध बीसीसीआयच्या लक्षात कसे आले नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction