मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : दोन्ही नव्या टीमचे 6 खेळाडू ठरले, श्रेयस-राहुल कॅप्टन!

IPL 2022 : दोन्ही नव्या टीमचे 6 खेळाडू ठरले, श्रेयस-राहुल कॅप्टन!

आयपीएल 2022 (IPL 2022) साठी जुन्या 8 टीमनी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी नोव्हेंबर महिन्यात जाहीर केली. यानंतर अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊ (Lucknow) या दोन टीमना प्रत्येकी 3-3 खेळाडू रिटेन करण्याची मूभा होती.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 17 डिसेंबर : आयपीएल 2022 (IPL 2022) साठी जुन्या 8 टीमनी त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी नोव्हेंबर महिन्यात जाहीर केली. यानंतर अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊ (Lucknow) या दोन टीमना प्रत्येकी 3-3 खेळाडू रिटेन करण्याची मूभा होती. या दोन्ही टीमना 25 डिसेंबरपर्यंत खेळाडूंच्या नावांची घोषणा करायची आहे, यानंतर पुढच्या महिन्यात खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) होणार आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या टीमनी त्यांचे प्रत्येकी 3-3 असे 6 खेळाडू निश्चित केल्याचं वृत्त आहे. पंजाब किंग्सची (Punjab Kings) साथ सोडलेला केएल राहुल (KL Rahul) लखनऊ टीमचं नेतृत्व करणार आहे, तर राशिद खान (Rashid Khan) आणि इशान किशनदेखील (Ishan Kishan) लखनऊच्या टीमचा भाग असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे अहमदाबादची टीम श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) कर्णधार होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीमकडून माघार घेतली होती. श्रेयस अय्यरशिवाय हार्दिक पांड्यालाही (Hardik Pandya) अहमदाबादने निवडलं आहे. तसंच तिसऱ्या खेळाडूसाठी डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) यांच्यापैकी एकाला अहमदाबादची टीम पसंती देऊ शकते.

पंजाब किंग्स केएल राहुलला टीममध्ये ठेवण्यासाठी इच्छुक होती, पण राहुल मात्र यासाठी तयार नव्हता. तर राशिद खानला सनरायजर्स हैदराबादने आपल्याला पहिल्या पसंतीचा खेळाडू ठेवावं, अशी मागणी केली होती. हैदराबादने केन विलियसमनला पहिला क्रमांक दिल्यामुळे राशिदने हैदराबादकडून न खेळण्याचा निर्णय घेतला.

2014 नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये 10 टीमचा समावेश होणार आहे. टीम वाढल्यामुळे आता फॉरमॅटमध्येही बदल करण्यात येणार आहे. या 10 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागलं जाण्याची शक्यता आहे. यंदाची आयपीएल भारतात खेळवण्यासाठी बीसीसीआय आग्रही आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेच ही प्रतिक्रिया दिली होती. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020 चा संपूर्ण मोसम युएईमध्ये खेळवला गेला, तर 2021 मोसमाचा पहिला राऊंड भारतात झाला, पण टीममध्ये कोरोना व्हायरसची एण्ट्री झाल्यामुळे दुसरा राऊंड पुन्हा युएईमध्येच झाला.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction