मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : Ab De Villiers पुन्हा येणार RCB च्या ताफ्यात! स्वत:च दिली मोठी Update

IPL 2022 : Ab De Villiers पुन्हा येणार RCB च्या ताफ्यात! स्वत:च दिली मोठी Update

एबी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार असल्याची घोषणा केली आहे. बराच काळ एबी आरसीबीचा (RCB) भाग होता, पण या मोसमात तो खेळला नाही.

    मुंबई, 24 मे : एबी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार असल्याची घोषणा केली आहे. बराच काळ एबी आरसीबीचा (RCB) भाग होता, पण या मोसमात तो खेळला नाही. आयपीएल 2021 मध्ये एबी शेवटचा खेळला होता. विराट कोहली (Virat Kohli) आणि एबीची मैत्री जगजाहीर आहे. काहीच दिवसांपूर्वी विराटने एबी पुढच्या वर्षी टीममध्ये येऊ शकतो, असं म्हणलं होतं. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने उत्कृष्ट कामगिरी करत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं. 25 मे रोजी आरसीबी लखनऊविरुद्ध एलिमिनेटरची मॅच खेळणार आहे. VUSport सोबत बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला, 'मला विराटने मी टीमशी पुन्हा जोडला जातोय हे सांगितलं त्याबाबत मला आनंद आहे. मला चिन्नास्वामी स्टेडियम पुन्हा चाहत्यांनी भरलेलं पाहायचं आहे. आम्ही अजून याबाबत काहीही निश्चित केलेलं नाही, पण पुढच्या वर्षी मी आयपीएलच्या जवळपास असेन. माझा रोल काय असेल, हे मला माहिती नाही. पुढच्या वर्षी काही मॅच बँगलोरमध्ये होणार आहेत, असं मी ऐकलं. मला माझं दुसरं घर असलेल्या बँगलोरला यायचं आहे.' आयपीएलच्या या मोसमाआधी विराट कोहलीने आरसीबीची कॅप्टन्सी सोडली. एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या सुरूवातीच्या काही मोसमांमध्ये दिल्लीकडून खेळला. 2011 साली तो आरसीबीच्या टीममध्ये आला आणि लागोपाठ 11 मोसम खेळला. आरसीबीकडून एबीने 157 सामन्यांमध्ये 4,522 रन केले. आरसीबीकडून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये एबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. 38 वर्षांच्या एबी डिव्हिलियर्सचं टी-20 क्रिकेटमधलं रेकॉर्डही धमाकेदार आहे. 340 मॅचच्या 320 इनिंगमध्ये त्याने 37 च्या सरासरीने 9,424 रन केले, यात 4 शतकं आणि 69 अर्धशतकांचा समावेश आहे. 73 पेक्षा जास्त वेळा एबीने 50 पेक्षा जास्त रनच्या खेळी केल्या आहेत. नाबाद 133 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सने 78 टी-20 मॅच खेळल्या, यात त्याने 26 च्या सरासरीने 1,672 रन केले आणि 10 अर्धशतकं लगावली. नाबाद 79 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. त्याने 135 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, RCB

    पुढील बातम्या