मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये असूनही अर्जुन तेंडुलकर डग आऊटमध्ये का दिसत नाही?

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये असूनही अर्जुन तेंडुलकर डग आऊटमध्ये का दिसत नाही?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी (IPL 2021) मुंबई इंडियन्सने  (Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) लिलावात विकत घेतलं, पण अजूनपर्यंत एकाही सामन्यात अर्जुन मुंबईच्या डग आऊटमध्ये दिसला नाही.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबईची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी फक्त 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे, तर 3 सामने गमवावे लागले आहेत. मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनची खराब बॅटिंग हे त्यांच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. या मोसमात मुंबईच्या फक्त दोन बॅट्समननी अर्धशतक केलं आहे. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) कोलकात्याविरुद्ध (KKR) तर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) अर्धशतकी खेळी केली. मुंबईला पाचवेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या मधल्या फळीतील बॅट्समननाच संघर्ष करावा लागत आहे.

इशान किशन (Ishan Kishan), कायरन पोलार्ड (Kieron Pollard), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांना एक-एक रन काढताना अडचणी येत आहेत. मुंबईची कामगिरी अशीच सुरू राहिली तर मात्र रोहित शर्माला टीममध्ये बदल करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो.

रोहित शर्माने टीममध्ये बदल करायचा निर्णय घेतला तर तो ऑलराऊंडर असलेल्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आयपीएल लिलावात मुंबईने अर्जुनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. यानंतर अर्जुन मुंबई टीमसोबत सराव करताना दिसला. तसंच अर्जुनने मुंबईच्या टीममध्ये असलेल्या जेनसन बंधूंसोबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे.

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससोबत असला तरी अजून तो मॅचसाठी टीमच्या डग आऊटमध्ये किंवा ड्रेसिंग रूममध्ये दिसलेला नाही, त्यामुळे अर्जुन तेंडुलकर मॅचवेळी डग आऊटमध्ये का दिसत नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रित सिंग, सौरभ तिवारी, क्रिस लीन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, जेम्स नीशम, पियुष चावला, मार्को जेनसन, अर्जुन तेंडुलकर, इशान किशन, आदित्य तरे, क्विंटन डिकॉक, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, मोहसीन खान, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्ट, जयंत यादव, नॅथन कुल्टर नाईल, एडम मिल्ने, युधवीर सिंग

First published:

Tags: Arjun Tendulkar, IPL 2021, Mumbai Indians