मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : 2025 सालचा बेस्ट क्रिकेटर कोण? जडेजाच्या उत्तराने राजस्थान 'क्लीन बोल्ड'!

IPL 2021 : 2025 सालचा बेस्ट क्रिकेटर कोण? जडेजाच्या उत्तराने राजस्थान 'क्लीन बोल्ड'!

2025 साली सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण असेल? असा प्रश्न राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विचारला. यावर कमेंट करताना रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने मजेशीर उत्तर दिलं.

2025 साली सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण असेल? असा प्रश्न राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विचारला. यावर कमेंट करताना रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने मजेशीर उत्तर दिलं.

2025 साली सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण असेल? असा प्रश्न राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विचारला. यावर कमेंट करताना रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने मजेशीर उत्तर दिलं.

मुंबई, 13 मार्च : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि बँगलोर यांच्यामध्ये (Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यंदाच्या वर्षीचा पहिला सामना रंगणार आहे. आयपीएलच्या या मोसमासाठी चेन्नईच्या टीमने (CSK) तयारीला सुरूवात केली आहे. चेन्नईतल्या एमए चिदंबरम स्टेडियमवर धोनीसह (MS Dhoni) काही खेळाडू सराव करत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला रविंद्र जडेजाही (Ravindra Jadeja) आयपीएलच्या या मोसमासाठी तयार आहे. मागच्या मोसमात निराशा केलेल्या चेन्नईला यावर्षी चांगली कामगिरी करण्यासाठी जडेजाचा फॉर्म महत्त्वाचा असेल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रविंद्र जडेजाच्या अंगठा फ्रॅक्चर झाला होता, ज्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या सीरिजला मुकला. गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेला रविंद्र जडेजा सोशल मीडियावर मात्र चांगलाच सक्रीय आहे.

2025 साली सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण असेल? असा प्रश्न राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विचारला. यावर कमेंट करताना जडेजाने स्वत:च नाव लिहिलं. यावर राजस्थान रॉयल्सने पुन्हा कमेंट करत चर्चा संपली, असं उत्तर दिलं.

आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर राहिली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफ गाठता आली नाही. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची कामगिरीही गेली अनेक वर्ष निराशाजनक राहिली आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात विजय मिळवल्यानंतर राजस्थानला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावर्षी लिलावाआधी राजस्थानने स्टीव्ह स्मिथला सोडून दिलं आणि संजू सॅमसनला कर्णधार केलं. तर लिलावामध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर क्रिस मॉरिसला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएल इतिहासामध्ये एका खेळाडूवर लागलेली ही सगळ्यात मोठी बोली होती.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Rajasthan Royals, Ravindra jadeja