• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL 2021 : Deepak Chahar ने स्टेडियममध्येच केलं Propose, कोण आहे त्याची Girlfriend?

IPL 2021 : Deepak Chahar ने स्टेडियममध्येच केलं Propose, कोण आहे त्याची Girlfriend?

आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK vs PBKS) पराभव केला, पण या सामन्यानंतर चर्चा झाली ती फक्त दीपक चहरची (Deepak Chahar Propose).

  • Share this:
    दुबई, 7 ऑक्टोबर : आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK vs PBKS) पराभव केला, पण या सामन्यानंतर चर्चा झाली ती फक्त दीपक चहरची (Deepak Chahar Propose). मॅच संपल्यानंतर चेन्नईचा फास्ट बॉलर दीपक चहरने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. दीपकने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केला. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मॅच संपल्यानंतर दीपक लगेचच स्टॅण्डमध्ये गेला आणि त्याने एका गुडघ्यावर उभं राहून गर्लफ्रेंडला लग्नासाठी मागणी घातली. यानंतर स्टॅण्डमध्ये असलेल्या लोकांनीही टाळ्या वाजवल्या. गर्लफ्रेंडने जेव्हा हो म्हणलं तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
    हा फोटोच सगळं काही सांगून जातो, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत, असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. दीपक चहरला त्याचे चेन्नईच्या टीममधले सहकारी, आयपीएलमधले खेळाडू आणि चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या, तसंच त्याचं अभिनंदनही केलं. कोण आहे दीपकची गर्लफ्रेंड? दीपक चहरच्या गर्लफ्रेंडचं नाव जया भारद्वाज (Jaya Bharadwaj) आहे. दिल्लीतल्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जया काम करते. प्रसिद्धीपासून फार लांब असल्यामुळे जयाबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. सोशल मीडियावरही ती फारशी ऍक्टिव्ह नसते. एमटीव्ही स्पिल्ट्स व्हिला सिझन 2 चा विजेता असलेल्या सिद्धार्थ भारद्वाजची ती लहान बहिण आहे. सिद्धार्थ भारद्वाज फक्त VJ नाही तर मॉडेलही आहे. दीपक चहर चेन्नई सुपर किंग्स टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरला चमकदार कामगिरी करता आली नाही. 4 ओव्हरमध्ये त्याने 48 रन दिल्या, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दीपक चहर टीम इंडियाच्या स्टॅण्डबाय खेळाडूंमध्ये आहे.
    Published by:Shreyas
    First published: