मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आधी कर्णधारपदावरून हटवलं, मग टीममधून डच्चू, अशी होती वॉर्नरची प्रतिक्रिया

IPL 2021 : आधी कर्णधारपदावरून हटवलं, मग टीममधून डच्चू, अशी होती वॉर्नरची प्रतिक्रिया

आयपीएलमधल्या (IPL) सगळ्यात यशस्वी खेळाडूपैकी एक असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) हैदराबादच्या (SRH) कर्णधारपदावरून हटवण्यात आलं, यानंतर त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यातूनही डच्चू देण्यात आला.

  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 2 मे : आयपीएलमधल्या (IPL) सगळ्यात यशस्वी खेळाडूपैकी एक असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) हैदराबादच्या (SRH) कर्णधारपदावरून हटवण्यात आलं, यानंतर त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यातूनही डच्चू देण्यात आला. या प्रकारानंतर डेव्हिड वॉर्नर नाराज आणि निराश होता, असं हैदराबाद टीमचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट टॉम मूडी (Tom Moody) यांनी सांगितलं. एकच दिवसआधी वॉर्नरला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आणि त्याच्याऐवजी केन विलियमसनला (Kane Williamson) टीमचं नेतृत्व देण्यात आलं. टॉम मूडी मॅचआधी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, 'वॉर्नरला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात संधी दिली जाणार नाही. टीम मॅनेजमेंटने चर्चा केल्यानंतर फक्त दोन परदेशी बॅट्समन मैदानात उतरतील असा निर्णय घेण्यात आला. कर्णधार केन विलियमसन आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) चांगले खेळत आहेत, त्यामुळे परदेशी खेळाडू म्हणून त्यांना संधी देण्यात आली, याशिवाय एक ऑलराऊंडर म्हणून मोहम्मद नबी (Mohammad Nabi) आणि बॉलर म्हणून राशिद खान (Rashid Khan) टीममध्ये असेल.' 'प्लेयिंग इलेव्हनची निवड करणं कठीण होतं, कारण एका खेळाडूला बाहेर बसवावं लागणार होतं, दुर्दैवाने डेव्हिड वॉर्नर तो खेळाडू आहे. वॉर्नर आतापर्यंत टीमसाठी चांगला खेळला आहे, पण कर्णधारपदावरून काढल्यानंतर तो खूप हताश झाला होता, कोणताही मोठा खेळाडू या निर्णयाने निराश होतोच. पण टीम म्हणून आपल्याला जे मिळवायचं आहे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्याला पटलं. तो कायमच टीमसोबत राहिला आहे आणि टीमही त्याच्यासोबत आहे,' अशी प्रतिक्रिया टॉम मूडी यांनी दिली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात डेव्हिड वॉर्नरला चांगली कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईविरुद्धच्या मागच्या सामन्यात वॉर्नरने 57 रन केले होते, पण यासाठी तो 57 बॉल खेळला. पराभवानंतर आपल्या संथ बॅटिंगमुळेच टीमचा पराभव झाल्याचं वॉर्नरने मान्य केलं. वॉर्नरने या मोसमात 6 सामन्यांमध्ये 110 च्या स्ट्राईक रेटने 193 रन केले, यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच हैदराबादची टीम अस्थिर वाटत होती. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मनिष पांडेला (Manish Pandey) डच्चू देण्यात आला, यानंतर पांडेला बाहेर बसवण्याचा निर्णय निवड समितीचा होता, अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली होती. वॉर्नर आणि टीम मॅनजमेंटमध्ये वाद सुरू होते आणि मनिष पांडेबाबतच्या वक्तव्यामुळे आगीत तेल टाकण्याचं काम केलं, असं सांगितलं जात आहे. न्यूझीलंडचे माजी फास्ट बॉलर आणि आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणारे सायमन डूल यांनीही वॉर्नरला मनिष पांडेबाबतचं वक्तव्य भोवल्याची प्रतिक्रिया दिली.
First published:

Tags: Cricket, David warner, IPL 2021, SRH

पुढील बातम्या