मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : पांड्या बंधूंचा संघर्ष, रोहितसमोर आहेत या खेळाडूंचे पर्याय

IPL 2021 : पांड्या बंधूंचा संघर्ष, रोहितसमोर आहेत या खेळाडूंचे पर्याय

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 मॅचपैकी 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पांड्या बंधूंचा (Pandya Brothers) खराब फॉर्म हे मुंबईच्या अपयशाचं मुख्य कारण आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

चेन्नई, 24 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 मॅचपैकी 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यात त्यांच्या मधल्या फळीने महत्त्वाची भूमिका बजावली, पण यंदा मात्र मुंबईच्या मजबूत अशा मधल्या फळीला एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

इशान किशन (Ishan Kishan), कायरन पोलार्ड (Kieron Pollard), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. यातल्या पांड्या बंधूंच्या फॉर्ममुळे मुंबईचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे.

आयपीएलच्या या मोसमात हार्दिकने 13, 15, 7, 0 आणि 1 रन करून आऊट झाला. 5 सामन्यांमध्ये हार्दिकने फक्त 36 रन केल्या आहेत. खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दिकने या मोसमात बॉलिंगही केली नाही. बाऊंड्री लाईनवरून थ्रो करताना खांद्याची दुखापत वाढू शकते, म्हणून हार्दिक फिल्डिंग करतानाही 30 यार्डच्या आतमध्ये उभा राहत आहे.

दुसरीकडे कृणाल पांड्यानेही या मोसमात निराश केलं आहे. कृणाल पांड्याने 5 सामन्यांमध्ये 7.25 ची सरासरी आणि 107.40 च्या स्ट्राईक रेटने फक्त 29 रन केले आहेत. तसंच बॉलिंगमध्ये कृणालने 3 विकेट घेतल्या. या मोसमात कृणालने एकूण 16 ओव्हर बॉलिंग केली, यात त्याने 38.66 च्या सरासरीने 116 रन दिले.

रोहितकडे कोणते पर्याय?

पांड्या बंधूंचा फॉर्म बघता रोहित शर्मा कठोर निर्णय घेणार का? असा प्रश्न मुंबईचे चाहते विचारत आहेत. मुंबईची मधली फळी मजबूत करण्यासाठी रोहितकडे पर्यायही उपलब्ध आहेत. जेम्स नीशम (James Neesham), अनुकूल रॉय (Anukul Roy) आणि अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) या तीन ऑलराऊंडरना अजून संधी दिलेली नाही.

रोहितने दिल्ली आणि पंजाबविरुद्ध फक्त तीन परदेशी खेळाडूंना संधी दिली होती. आयपीएल नियमानुसार प्रत्येक टीम एका सामन्यात जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडू घेऊन खेळू शकते, पण मुंबईने चेन्नईच्या स्पिनर्सना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर जयंत यादवला (Jayant Yadav) टीममध्ये घेतलं. मुंबईचे पुढचे चार सामने दिल्लीमध्ये होणार आहेत, त्यामुळे दिल्लीचं छोटं मैदान लक्षात घेता रोहित कदाचित राहुल चहर, कृणाल पांड्या आणि जयंत यादव हे तीन स्पिनर खेळवणार नाही, त्यामुळे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर असलेल्या जेम्स नीशमला संधी मिळू शकते.

याशिवाय मुंबईकडे पियुष चावलाचाही (Piyush Chawala) पर्याय आहे. पियुष चावला आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा खेळाडू आहे, तसंच बॅटिंगमध्येही तो फटकेबाजी करू शकतो, तसंच ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलनेही (Nathan Coulter Nile) याआधी त्याच्या बॅटिंगची चुणूक दाखवली आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रित सिंग, सौरभ तिवारी, क्रिस लीन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, जेम्स नीशम, पियुष चावला, मार्को जेनसन, अर्जुन तेंडुलकर, इशान किशन, आदित्य तरे, क्विंटन डिकॉक, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, मोहसीन खान, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्ट, जयंत यादव, नॅथन कुल्टर नाईल, एडम मिल्ने, युधवीर सिंग

First published:

Tags: Cricket, Hardik pandya, IPL 2021, Krunal Pandya, Mumbai Indians, Rohit sharma