मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : गरजण्यापासून फक्त एक मॅच दूर, मुंबईच्या स्टार खेळाडूला विश्वास

IPL 2021 : गरजण्यापासून फक्त एक मॅच दूर, मुंबईच्या स्टार खेळाडूला विश्वास

IPL 2021 मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनची खराब बॅटिंग हे त्यांच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. या मोसमात मुंबईच्या फक्त दोन बॅट्समननी अर्धशतक केलं आहे. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) कोलकात्याविरुद्ध (KKR) तर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) अर्धशतकी खेळी केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

चेन्नई, 24 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबईची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी फक्त 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आहे, तर 3 सामने गमवावे लागले आहेत. मुंबई इंडियन्सच्या बॅट्समनची खराब बॅटिंग हे त्यांच्या अपयशाचं मुख्य कारण आहे. या मोसमात मुंबईच्या फक्त दोन बॅट्समननी अर्धशतक केलं आहे. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) कोलकात्याविरुद्ध (KKR) तर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) अर्धशतकी खेळी केली.

इशान किशन (Ishan Kishan), कायरन पोलार्ड (Kieron Pollard), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांना एक-एक रन काढताना अडचणी येत आहेत. पण सूर्यकुमार यादवने मात्र बॅट्समन फॉर्ममध्ये येण्यापासून फक्त एक मॅच दूर आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 63 रनची खेळी केली, पण तरीही मुंबईला 20 ओव्हरमध्ये 131 रनच करता आले. आयपीएलच्या पहिल्या पाचही सामन्यांमध्ये मुंबईला 160 रनचा टप्पाही ओलांडता आला नाही, पण तरीही सूर्यकुमार यादव चिंतेत नाही.

पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्ही नेटमध्ये प्रत्येक दिवशी मेहनत करत आहोत. फक्त एक मॅचचाच प्रश्न आहे. प्रत्येक खेळाडू सगळ्या सामन्यांमध्ये जबाबदारी घ्यायचा प्रयत्न करत आहे, पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही. खेळामध्ये असं होतं, आम्ही दमदार पुनरागमन करू, असा मला विश्वास आहे.'

'चेन्नईमधली परिस्थिती थोडी वेगळी होती, पण सराव करताना आम्ही अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांवरच खेळतो. आधीही आम्ही अशा परिस्थितींचा सामना केला आहे, त्यामुळे आम्ही धडाक्यात पुनरागमन करू शकतो. एका सामन्यात जबरदस्त कामगिरी केली, तर मग आम्ही मागे वळून बघणार नाही,' अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.

चेन्नईमधले मुंबईचे सगळे सामने संपलेले आहेत. आता त्यांच्या पुढच्या 4 मॅच दिल्लीमध्ये आणि उरलेले सामने कोलकाता आणि बँगलोरमध्ये होणार आहेत. मुंबईचा पुढचा सामना 29 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Suryakumar yadav