मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : ...मग तर कोणीही कॅप्टन्सी करेल, KKR च्या कोड लॅन्ग्वेजवर सेहवाग भडकला

IPL 2021 : ...मग तर कोणीही कॅप्टन्सी करेल, KKR च्या कोड लॅन्ग्वेजवर सेहवाग भडकला

दोनवेळची आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी पंजाब किंग्सचा (KKR vs PBKS) पराभव केला, पण या सामन्यात कोलकात्याने वापरलेल्या रणनितीवर टीका होत आहे. कोलकात्याच्या या रणनितीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 27 एप्रिल : दोनवेळची आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी पंजाब किंग्सचा (KKR vs PBKS) पराभव केला, पण या सामन्यात कोलकात्याने वापरलेल्या रणनितीवर टीका होत आहे. या मॅचमध्ये कोलकात्याचे एनलिस्ट नॅथन लिमन (Nathan Leamon) यांनी डगआऊटमधून कर्णधार इयन मॉर्गनला (Eoin Morgan) कोड लॅन्गवेजचा वापर करून संदेश दिला. लिमन यांनी हातात पोस्टर घेऊन मॉर्गनला 54 नंबर दाखवला. कोलकात्याच्या या रणनितीवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) टीका केली आहे. अशाप्रकारे एखाद्याला डग आऊटमधून मॅच चालवण्याची परवानगी दिली, तर मैदानातून कोणीही खेळाडू कॅपटन्सी करू शकतो, असं सेहवाग म्हणाला.

मॅच सुरू असताना लिमन यांनी दाखवलेल्या 54 नंबरबद्दल कॉमेंट्री करणाऱ्या खेळाडूंनीही अर्थ काढायचा प्रयत्न केला, पण हा नंबर कशासाठी दाखवला याबद्दल कोणलाच काही सांगता आलं नाही.

क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, 'सपोर्ट स्टाफकडून मदत घेण्यात काहीच अडचण नाही, पण हे पाहून कर्णधाराची समज कमी आहे, असं वाटतं. आम्ही याप्रकारचं कोड वर्डमधील बोलणं लष्करामध्येच बघितलं आहे. पोस्टर घेऊन सांगणं हे त्यांच्या रणनितीचा भाग असेल. कोणत्या वेळी कोणत्या बॉलरला बॉलिंग द्यायची, असंही सांगितलं जात असेल. टीम प्रशासन आणि कोच कर्णधाराला डग आऊटमधून थोडी मदत देऊ शकतो, पण जर अशाप्रकारे मैदानाबाहेरून खेळ चालवला जात असेल, तर कोणीही कर्णधार होऊ शकतं.'

'या रणनितीमुळे इयन मॉर्गन ज्यासाठी प्रसिद्ध आहे तेच त्याला करता येत नाही. मॉर्गनने त्याच्या डोक्याचा वापर करूनच इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून दिला, पण आता या गोष्टी बघून योग्य वाटलं नाही. मैदानाबाहेरून मदत मिळाली पाहिजे, पण कोणत्या बॉलरला कधी वापरायचं, याचं कर्णधाराला स्वत:चंही ज्ञान असलं पाहिजे. जर कर्णधार काही विसरला असेल, तर त्याला आठवण करून देण्यासाठी हे करण्यात आलं असेल, तर ते योग्य आहे,' असं सेहवागने सांगितलं.

2009 पासून नॅथन लिमन इंग्लंडच्या टीमसोबत आहेत. 2020 साली पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्यांनी मॉर्गनला काही नंबर आणि अक्षरांमधून संदेश पाठवले. यानंतर लिमन यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

कोलकात्याने या सामन्यात पंजाबचा 5 विकेटने पराभव केला. पंजाबने 9 विकेट गमावून 123 रन केले, हे आव्हान कोलकात्याने 16.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पूर्ण केलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातला कोलकात्याचा हा दुसरा विजय होता. याचसोबत कोलकाता 4 पॉईंट्ससह पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. पंजाबचा या मोसमातला हा चौथा पराभव आहे.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, KKR, Virender sehwag