मुंबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये हैदराबादच्या (SRH) टीमने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. या टीमने 12 पैकी 10 मॅच गमावल्या आहेत. प्ले-ऑफच्या रेसमधून हैदराबादची टीम आधीच बाहेर गेली आहे. रविवारी हैदरबादचा या मोसमातला 10 वा पराभव झाला. केकेआरने (KKR vs SRH) त्यांना 6 विकेटने धूळ चारली. पहिले बॅटिंग करताना हैदरबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 115 रन करता आले. कोलकात्यालाही हा विजय मिळवताना मेहनत करावी लागली. 2 बॉल शिल्लक असताना कोलकात्याने हे आव्हान पार केलं. हैदरबादच्या बॅट्समननी केलेल्या या कामगिरीची तुलना वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) झोपेच्या गोळ्यांसोबत केली आहे.
'हैदराबादने रॉय आणि साहाला ओपनिंगला पाठवलं, पण दोघं लवकर आऊट झाले. यानंतर केन विलियमसन आणि प्रियम गर्ग यांनी इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. ही खेळपट्टी एवढी संथ होती की यावर रन करणंही कठीण होतं. यानंतर अब्दुल समदने तीन सिक्स मारत 25 रन केले, पण तोदेखील आऊट झाला. यानंतर हैदरबादचे दुसरे बॅट्समन झोपेच्या गोळीसारखे दिसत होते. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये मी झोपून गेलो, जेव्हा उठलो तेव्हा हैदरबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 115 रन केल्या होत्या,' असं सेहवाग म्हणाला.
आयपीएलच्या या मोसमात हैदरबादने अखेरच्या दोन मॅच जिंकल्या तरी ते अखेरच्या स्थानावरच राहणार आहेत. या मोसमात हैदरबादला आपल्या अनुभवी खेळाडूंच्या खराब फॉर्मचा सामना करावा लागला. टीमने डेव्हिड वॉर्नरला (David Warner) मोसमाच्या मध्येच कर्णधारपदावरून काढलं, यानंतर त्याला खेळण्याचीही संधी दिली नाही. वॉर्नरने या मोसमात 8 सामन्यांमध्ये 24.37 च्या सरासरीने 195 रन केले. तर केदार जाधव, ऋद्धीमान साहा, मनिष पांडे यांनाही संघर्ष करावा लागला. दुसऱ्या राऊंडमध्ये हैदरबादला ओपनर जॉनी बेयरस्टोची कमी जाणवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, SRH, Virender sehwag