Home /News /sport /

IPL 2021 : CSK ची टीम बघून सेहवाग हैराण, म्हणाला...

IPL 2021 : CSK ची टीम बघून सेहवाग हैराण, म्हणाला...

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (CSK vs Delhi Capitals) मजबूत टीम मैदानात उतरवली आहे. चेन्नईची ही टीम पाहून वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) हैराण झाला आहे.

    मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (CSK vs Delhi Capitals) मजबूत टीम मैदानात उतरवली आहे. चेन्नईची ही टीम पाहून वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) हैराण झाला आहे. सेहवागने ट्विटरवर चेन्नईची बॅटिंग संपतच नसल्याचं मीम शेयर केलं. चेन्नई सुपरकिंग्सच्या टीममध्ये सगळे 11 खेळाडू बॅटिंग करण्यात सक्षम आहेत. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात चेन्नईचा दीपक चहर (Deepak Chahar) 11 व्या क्रमांकावर बॅटिंगला येईल. दीपक चहर हा ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. या टीममध्ये नवव्या क्रमांकावर ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo), दहाव्या क्रमांकावर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) खेळणार आहे. सेहवाग त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला, 'या बॅटिंगमध्ये ब्राव्हो 9व्या, शार्दुल 10व्या आणि चहर 11व्या क्रमांकावर आहे. ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही.' दिल्ली कॅपिटल्स शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमायर, क्रिस वोक्स, आर.अश्विन, टॉम करन, अमित मिश्रा आवेश खान चेन्नईची टीम ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, एमएस धोनी, मोईन अली, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वॅन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, दीपक चहर
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021

    पुढील बातम्या