मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: चाहत्याचं कोहलीवर ‘विराट’ प्रेम; जळता कापूर हातात ठेवून केली आरती; VIDEO VIRAL

IPL 2021: चाहत्याचं कोहलीवर ‘विराट’ प्रेम; जळता कापूर हातात ठेवून केली आरती; VIDEO VIRAL

चाहत्याचं कोहलीवर ‘विराट’ प्रेमच; जळता कापूर हातात ठेवून केली आरती

चाहत्याचं कोहलीवर ‘विराट’ प्रेमच; जळता कापूर हातात ठेवून केली आरती

Virat Kohli Fan Video Viral: सध्या विराट कोहलीचा एक चाहता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. विराटच्या प्रेमापोटी या चाहत्याने विराटसाठी कायपण म्हणत चक्क आपल्या हातावर कापूर जाळले आणि त्याची आरती केली.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, ०8 ऑक्टोबर: आयपीएल (IPL 2021 Latest Updates) स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात 08 ऑक्टोबर हा दिवस खास आहे. या दिवशी पहिल्यांदाच 2 मॅच एकाच वेळी होणार आहेत. आज होणाऱ्या दोन संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) या संघात लढत होणार आहे. दरम्यान, एका विराट चाहत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli Performance in IPL 2021) असून एक चाहता चक्क जळता कापूर हातात ठेवून विराटची आरती करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या विराट कोहलीचा एक चाहता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. विराटच्या प्रेमापोटी या चाहत्याने विराटसाठी कायपण म्हणत चक्क आपल्या हातावर कापूर जाळले आणि त्याची आरती केली.

 

हा व्हिडीओ विराट कोहली ट्रेंड्स नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. बुधवारी (6 ऑक्टोबर) सनराययझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यानंतर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवण्यात अपयश आले होते. तरीदेखील या चाहत्याचे आपल्या आवडत्या खेळाडूवरील प्रेम काही कमी झाले नाही.

हे वाचा- एकाच वेळी होणार 2 मॅच, MI vs SRH आणि RCB vs DC चा मुकाबला इथे पाहता येणार

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा 4 धावांनी पराभव

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉयने 44 धावांची खेळी केली होती. तर केन विलियमसनने 31 धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 141 धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक 41 तर ग्लेन मॅक्सवेलने 40 धावांचे योगदान दिले. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन्ही टीमचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित झाला आहे. यापैकी दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर राहणार हे नक्की आहे. आरसीबीला टॉप 2 मध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीवर मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे. 'प्ले ऑफ'पूर्वी होणाऱ्या मॅचमध्ये दोन्ही टीम संपूर्ण क्षमतेनं खेळणार की काही खेळाडूंना विश्रांती देणार? याची उत्सुकता आहे.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021, RCB, Virat kohli