अबु धाबी, 14 सप्टेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) टीम आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा राऊंड खेळण्यासाठी सज्ज आहे. आरसीबीचा पहिलाच मुकाबला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) आहे. 20 सप्टेंबरला सोमवारी हा सामना अबु धाबीमध्ये होणार आहे. विराट कोहली लीगच्या दुसऱ्या राऊंडसाठी युएईला रवाना झाला आहे, तसंच तो लवकरच तयारीलाही सुरुवात करणार आहे. आरसीबीने दुसऱ्या राऊंडसाठी 4 नव्या खेळाडूंना टीममध्ये घेतलं आहे. यात श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदु हसरंगाही (Wanindu Hasaranga) आहे.
हसरंगाने भारताविरुद्धच्या टी-20 आणि वनडे सीरिजमध्ये चांगली बॉलिंग केली आहे. त्याने 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये सर्वाधिक 7 विकेट घेतल्या होत्या. तर वनडे सीरिजमध्ये त्याला 3 विकेट मिळाल्या होत्या. या कामगिरीनंतर हसरंगाला आरसीबीने एडम झम्पाच्याऐवजी (Adam Zampa) टीममध्ये घेतलं. विराटने केकेआरविरुद्धच्या मॅचआधी हसरंगाला मेसेजही केला आहे.
हसरंगादेखील विराट कोहलीचा मेसेज पाहून खूश झाला. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार हसरंगा सध्या दक्षिण आप्रिकेविरुद्ध टी-20 सीरिज खेळत आहे. विराटचा मेसेज पाहून हसरंगाला सुखद धक्काच बसला.
कोहली इंग्लंडमधून युएईला पोहोचला असून तो सध्या क्वारंटाईन झाला आहे. या कालावधीमध्ये तो नव्या आणि जुन्या खेळाडूंशी संवाद साधत आहे.
'मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. मागच्या महिन्यातही आपण लीगबाबत खूप बोललो होतो. टीमचे अनेक महत्त्वाचे खेळाडू स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये नाहीत, पण त्यांच्याऐवजी आपण चांगल्या खेळाडूंना टीममध्ये घेतलं आहे. युएईमधली परिस्थिती बघता त्यांच्यातलं स्किल शानदार आहे. मी सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे आणि टीमसोबत सराव करण्याची वाट पाहत आहे,' असं विराट त्याच्या मेसेजमध्ये म्हणाला.
आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर
आरसीबीने दुसऱ्या राऊंडसाठी चार नवे खेळाडू निवडले आहेत. यामध्ये झम्पाच्याऐवजी वानिंदु हसरंगा, फिन एलनऐवजी टीम डेव्हिड, केन रिचर्डसनऐवजी जॉर्ज गार्टन आणि डॅनियल सॅम्सऐवजी दुश्मंता चमिरा यांना संधी दिली आहे. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी 5 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, RCB, Virat kohli