• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : विराटच्या स्वप्नांचा चुराडा, आयपीएल ट्रॉफीशिवायच कॅप्टन्सीचा शेवट

IPL 2021 : विराटच्या स्वप्नांचा चुराडा, आयपीएल ट्रॉफीशिवायच कॅप्टन्सीचा शेवट

आपल्या नेतृत्वात आरसीबीला (RCB) आयपीएल ट्रॉफी (IPL Trophy) जिंकवून देण्याचं विराट कोहलीचं (Virat Kohli) स्वप्न भंगलं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021 Eliminator) च्या एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा (KKR vs RCB) पराभव केला.

 • Share this:
  शारजाह, 11 ऑक्टोबर : आपल्या नेतृत्वात आरसीबीला (RCB) आयपीएल ट्रॉफी (IPL Trophy) जिंकवून देण्याचं विराट कोहलीचं (Virat Kohli) स्वप्न भंगलं आहे. आयपीएल 2021 (IPL 2021 Eliminator) च्या एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा (KKR vs RCB) पराभव केला, याचसोबत विराटच्या टीमचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आयपीएल सुरू व्हायच्या आधीच विराटने आपण या मोसमानंतर आरसीबीचं नेतृत्व करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं, तसंच आपण आयपीएलमध्ये आरसीबीकडूनच खेळत राहू आणि याच टीममधून खेळताना निवृत्त होऊ, असं सांगितलं होतं. 2013 साली विराट कोहलीने डॅनियल व्हिटोरीकडून आरसीबीची कॅप्टन्सी घेतली. यानंतर 9 मोसमांमध्ये एकदाही विराटला आपल्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. या दरम्यान 140 सामन्यांमध्ये विराटने बँगलोरचं नेतृत्व केलं, यापैकी 66 सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला आणि 70 मॅच त्यांना गमवाव्या लागल्या, तसंच 4 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही. 2008 म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून विराट कोहली आरसीबीकडून खेळत आहे. कोलकात्याविरुद्धच्या एलिमिनेटरआधी विराट कोहली आरसीबीकडून 207 मॅच खेळला, यात त्याने 37.40 ची सरासरी आणि 129.95 च्या स्ट्राईक रेटने 6,283 रन केल्या. विराटने आयपीएल इतिहासात 5 शतकं आणि 42 शतकं लगावली आहेत. एवढं दर्जेदार रेकॉर्ड असूनही विराटला आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात अपयश आलं. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने 2016 साली आयपीएल फायनल गाठली होती, पण फायनलमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 2017 आणि 2019 च्या मोसमात आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये तळाला राहिली होती. आता पुढच्या मोसमात विराट टीमसोबत असला तरी आरसीबी कॅप्टन्सीची जबाबादारी कोणाला देते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: