मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : लिलावात कोणीच बोली लावली नाही, श्रीसंतने दिलं आयपीएल टीमना प्रत्युत्तर

IPL 2021 : लिलावात कोणीच बोली लावली नाही, श्रीसंतने दिलं आयपीएल टीमना प्रत्युत्तर

आयपीएलच्या लिलावात (IPL Auction 2021) एस.श्रीसंत (S. Sreesanth) याच्यावर कोणत्याच टीमने बोली लावली नाही, त्यामुळे त्याचं आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचं स्वप्न भंगलं आहे. आयपीएल लिलावात बोली न लावणाऱ्या या टीमना श्रीसंतने त्याच्या कामगिरीतूनच प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 फेब्रुवारी : आयपीएलच्या लिलावात (IPL Auction 2021) एस.श्रीसंत (S. Sreesanth) याच्यावर कोणत्याच टीमने बोली लावली नाही, त्यामुळे त्याचं आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचं स्वप्न भंगलं आहे. आयपीएल लिलावात बोली न लावणाऱ्या या टीमना श्रीसंतने त्याच्या कामगिरीतूनच प्रत्युत्तर दिलं आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मध्ये केरळकडून खेळताना श्रीसंतने उत्तर प्रदेशविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 10 वर्षानंतर श्रीसंतने लिस्ट ए क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 38 वर्षांच्या श्रीसंतवर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली होती, पण कोर्टाच्या निकालानंतर ही बंदी 7 वर्ष करण्यात आली. यानंतर श्रीसंतने या मोसमात क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कपच्या चॅम्पियन भारतीय टीममध्ये श्रीसंत होता.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये श्रीसंतने 15 वर्षानंतर 5 विकेट घेण्याचा विक्रम श्रीसंतने केला. याआधी 2006 साली त्याने इंग्लंडविरुद्ध इंदूर वनडेमध्ये 55 रन देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सोमवारी उत्तर प्रदेशविरुद्ध श्रीसंतने 9.4 ओव्हरमध्ये 65 रन देऊन 5 विकेट घेतल्या. त्याने अभिषेक गोस्वामी, आकाशदीप नाथ, भुवनेश्वर कुमार, मोहसिन खान आणि शिवम शर्मा यांना आऊट केलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या उत्तर प्रदेशचा 49.4 ओव्हरमध्ये 283 रनवर ऑल आऊट झाला. श्रीसंतने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. ओडिसाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्येही श्रीसंतला दोन विकेट मिळाल्या होत्या. लिस्ट ए करियरमध्ये त्याने 88 मॅच खेळून 118 विकेट घेतल्या आहेत.

आयपीएलमध्ये 40 विकेट

श्रीसंत आयपीएलचे 5 मोसम खेळला. 2008 ते 2013 या कालावधीमध्ये त्याने 44 मॅचमध्ये 40 विकेट घेतल्या. 29 रन देऊन 3 विकेट श्रीसंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये तो पंजाब, कोच्ची आणि राजस्थानकडून खेळला. एकूण टी-20 करियरमध्ये श्रीसंतने 65 मॅचमध्ये 54 विकेट घेतल्या. काहीच दिवसांपूर्वी तो सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळला होता.

First published: