मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : UAE मध्ये स्टेडियममधून पाहता येणार मॅच, पूर्ण करावी लागणार ही अट

IPL 2021 : UAE मध्ये स्टेडियममधून पाहता येणार मॅच, पूर्ण करावी लागणार ही अट

आयपीएल 2021 (IPL 2021) चे उरलेले 31 सामने आता युएईमध्ये (UAE) होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये स्पर्धेला सुरुवात होईल, असा निर्णय शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीत करण्यात आला.

    मुंबई, 31 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) चे उरलेले 31 सामने आता युएईमध्ये (UAE) होणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये स्पर्धेला सुरुवात होईल, असा निर्णय शनिवारी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) बैठकीत करण्यात आला. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे, पण यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार युएई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितलं, 'युएईमध्ये आयपीएलच्या सामन्यांसाठी चाहत्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो. स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षक बसू शकतात. बीसीसीआयलाही याबाबत आपत्ती असणार नाही. युएईच्या नियमांनुसार ज्यांनी कोरोना लशीचा डोस घेतला आहे, त्यांना स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघता येईल.' बीसीसीआयचे अधिकारी सध्या दुबईमध्ये आहेत, यामध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि संयुक्त सचिव जयेश जॉर्ज आहेत. बीसीसीआयचे अधिकारी आयपीएल आयोजनासंबंधीच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यामध्ये हॉटेलचं भाडं हा मुख्य मुद्दा आहे, कारण दुबई एक्सपोमुळे तिकडे हॉटेलचे भाव खूप जास्त वाढले आहेत. मागच्यावर्षीही कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचं युएईमध्येच आयोजन करण्यात आलं होतं. अबू धाबी, शारजाह आणि दुबईमध्ये आयपीएल सामने खेळवले गेले. त्यावेळी मात्र प्रेक्षकांशिवायच सामने झाले होते. आयपीएलचे या मोसमाचे उरलेले सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात, असं वृत्त आहे. बीसीसीआय आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्ड यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतर आयपीएलचं पूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात येईल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळी आयपीएलचे 29 सामने झाले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Corona vaccine, Cricket, IPL 2021, UAE

    पुढील बातम्या