मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPLच्या पुढच्या हंगामात सेहवागला Mumbai Indiansमध्ये हवेत ‘हे’ तिघे खेळाडू

IPLच्या पुढच्या हंगामात सेहवागला Mumbai Indiansमध्ये हवेत ‘हे’ तिघे खेळाडू

IPL 2022 Auction: आयपीएलचा मेगा लिलाव पुढील वर्षी होणार आहे. त्याआधी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा जोरात सुरू आहे.

IPL 2022 Auction: आयपीएलचा मेगा लिलाव पुढील वर्षी होणार आहे. त्याआधी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा जोरात सुरू आहे.

IPL 2022 Auction: आयपीएलचा मेगा लिलाव पुढील वर्षी होणार आहे. त्याआधी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा जोरात सुरू आहे.

मुंबई, 9 ऑक्टोबर :  इंडियन प्रीमियर लीग 2021 ( Indian Premier League 2021) स्पर्धेच्या साखळी फेरीतल्या मॅचेस संपल्या आहेत. आता प्लेऑफच्या (IPL 2021 playoff) मॅचेस रंगणार आहेत. प्लेऑफमध्ये दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता हे संघ पोहोचले आहेत. दिल्ली आणि चेन्नई यांच्यात पहिली लढत होणार आहे. बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यात दुसरी लढत आहे.

यंदाच्या आयपीएलमधला मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) प्रवास आता संपला आहे. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्स टीम प्ले ऑफमध्ये पोहोचू शकली नाही; मात्र मुंबईने गटातली शेवटची मॅच जिंकली. शुक्रवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 42 धावांनी पराभव केला. आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पुढील वर्षीच्या आयपीएलची प्रतीक्षा आहे.

आयपीएलचा मेगा लिलाव पुढील वर्षी होणार आहे. त्याआधी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा जोरात सुरू आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) म्हटलं आहे, की मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना कायम ठेवावं.

IPL 2021: फक्त 1 मॅच खेळूनही केला मोठा रेकॉर्ड, सर्व भारतीयांना टाकलं मागं

वीरेंद्र सेहवागने क्रिकबझला सांगितलं, की 'मुंबई इंडियन्ससाठी तीन खेळाडू कायम ठेवण्याबद्दल माझं मत विचारल्यास मी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि ईशान शर्मा यांना कायम ठेवीन.' हार्दिक पंड्या ( Hardik Pandya) आणि ईशान किशन यांच्यात ईशानला का निवडलं असं विचारलं असता सेहवाग म्हणाला, की 'मला वाटतं तो लंबी रेस का घोडा आहे. ईशान तरुण आणि वयाने लहान आहे. त्यामुळे तो अधिक काळ खेळू शकतो. हार्दिकने गोलंदाजी केली नाही, तर त्याला लिलावात जास्त किंमत येणार नाही. त्याची दुखापत हा संघासाठी चिंतेचा विषय आहे.'

5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदा काय चुकलं? रोहितनं दिलं उत्तर

ईशान किशनने हैदराबादविरुद्ध जी खेळी केली, तशीच खेळी तो आगामी काळातही खेळेल. याचं कारण म्हणजे तो टॉप ऑर्डरमधला फलंदाज आहे, असंही सेहवाग म्हणाला. त्याचबरोबर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra ) म्हणाला, की मी मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांना कायम ठेवीन.

हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितनं दिलं मोठं अपडेट

शुक्रवारी ईशान किशनने हैदराबादविरुद्ध 32 चेंडूमध्ये 84 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने 16 चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालच्या मुंबई इंडियन्सने 235 रन्स केल्या. मुंबईला प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्यासाठी सनरायझर्सला 66 रन्सच्या आत रोखणं आवश्यक होतं; मात्र सनरायझर्सने 193 रन्स केल्या. मुंबईने मॅच जिंकली; मात्र मुंबई आणि कोलकाता दोघांचेही 14 गुण झाले. नेट रनरेटच्या जोरावर कोलकात्याने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

First published:

Tags: IPL 2021, Ipl 2022 auction, Mumbai Indians, Rohit sharma