• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : चुकीला माफी नाही! तीन कर्णधारांवर निलंबनाची टांगती तलवार, रोहितचाही समावेश

IPL 2021 : चुकीला माफी नाही! तीन कर्णधारांवर निलंबनाची टांगती तलवार, रोहितचाही समावेश

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आठही टीमच्या अजून अर्ध्या मॅचही झाल्या नसल्या तरी यातल्या तीन टीमचे कर्णधार अडचणीत सापडले आहेत. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), एमएस धोनी (MS Dhoni) आणि इयन मॉर्गनचा (Eoin Morgan) समावेश आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आठही टीमच्या अजून अर्ध्या मॅचही झाल्या नसल्या तरी यातल्या तीन टीमचे कर्णधार अडचणीत सापडले आहेत. आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक टीमला निर्धारित वेळेमध्येच 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागतात, पण चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चेन्नई (CSK), मुंबई (Mumbai Indians) आणि कोलकात्याने (KKR) वेळेमध्ये त्यांच्या 20 ओव्हर पूर्ण न केल्यामुळे या तिन्ही टीमच्या कर्णधारांना 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे. आता या मोसमात दुसऱ्यांदा टीमना मर्यादित वेळेत त्यांच्या ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत, तर कर्णधाराला 30 लाख रुपयांचा दंड तसंच खेळाडूंना मॅच फीच्या 25 टक्के दंड भरावा लागेल. तसंच तिसऱ्यांदा जर पुन्हा हीच चूक झाली तर कर्णधाराचं एका सामन्यासाठी निलंबन होईल, सोबतच त्याच्या मानधनातले 30 लाख रुपये दंड म्हणून भरावे लागतील. यंदाच्या आयपीएलमध्ये एमएस धोनी आणि रोहित शर्माला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचसाठी तर इयन मॉर्गनला चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी हा दंड भरावा लागला आहे. काय आहे आयपीएलचा नियम प्रत्येक टीमला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, पण आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. शिवाय या 90 मिनिटांत टीमला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक टीमला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक टीमला एका तासामध्ये 14.1 ओव्हर टाकावी लागतील. रोहित शर्मा, एमएस धोनी आणि इयन मॉर्गन यांना आता विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कारण या तिन्ही टीमच्या अजून कमीत कमी 10 मॅच बाकी आहेत. यातल्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये जर टीमना वेळेत ओव्हर पूर्ण करता आल्या नाहीत तर कर्णधारांचं प्ले-ऑफच्या सामन्यातही निलंबन होऊ शकतं. तसंच प्ले-ऑफच्या सामन्यात जर कर्णधाराला तिसऱ्यांदा मर्यादित वेळेत पूर्ण करता आल्या नाहीत आणि त्याची टीम फायनलमध्ये पोहोचली, तर तो कर्णधार फायनलही मुकू शकतो.
  Published by:Shreyas
  First published: