मुंबई, 29 मे : पुन्हा एकदा युएई (UAE) बीसीसीआयसाठी (BCCI) संकटमोचक बनलं आहे. कोरोना व्हायरसमुळे 29 मॅचनंतर स्थगित झालेल्या आयपीएलच्या (IPL 2021) उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन युएईमध्ये होणार आहे. 19 किंवा 20 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होऊ शकते. शनिवारी बीसीसीआयने एका विशेष बैठकीत याबाबत निर्णय घेतला. आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयोजन करण्याची बीसीसीआयची तयारी आहे. तर फायनल 10 ऑक्टोबरला होईल. युएईमध्ये तिसऱ्यांदा आयपीएलचं आयोजन करण्यात येईल.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा मागचा संपूर्ण मोसम युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण मोसम पूर्ण करायला युएई दुसऱ्यांदा बीसीसीआयची मदत करत आहे. 2014 साली सुरुवातीच्या 20 मॅच भारतात आयोजित करण्यात आल्या होत्या, यानंतर उरलेले सामने भारतात आयोजित करण्यात आले होते. आता 14 व्या मोसमात सुरुवातीचे 29 सामने भारतात झाल्यानंतर उरलेले सामने युएईमध्ये होतील.
2014 साली लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचा 7वा मोसम युएईमध्ये झाला. तत्कालिन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आयपीएलला सुरक्षा द्यायला नकार दिला, यानंतर आयपीएलचे सुरुवातीचे 20 सामने अबूधाबी, दुबई आणि शारजाहमध्ये आयोजित करण्यात आले.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बायो-बबलमध्ये कोरोनाने शिरकाव केला. अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाली, यानंतर 4 मे रोजी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, UAE