• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : या 4 खेळाडूंमुळे मुंबई बँगलोरवर पडणार भारी!

IPL 2021 : या 4 खेळाडूंमुळे मुंबई बँगलोरवर पडणार भारी!

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत (Mumbai Indians vs RCB) होणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकली आहे, तर विराटच्या (Virat Kohli) आरसीबीला एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही.

 • Share this:
  चेन्नई, 9 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत (Mumbai Indians vs RCB) होणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएल जिंकली आहे, तर विराटच्या (Virat Kohli) आरसीबीला एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबई लागोपाठ तिसऱ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. मुंबई आणि बँगलोर यांचं एकमेकांविरुद्धचं रेकॉर्ड बघितलं तर मुंबईचाच पगडा भारी आहे. मुंबई इंडियन्सच्या परदेशी खेळाडूंकडे बघितलं तर दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर आणि ओपनर क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) याने मागच्या मोसमात शानदार कामगिरी केली. डिकॉकने मागच्यावर्षी 16 सामन्यांमध्ये 36 च्या सरासरीने आणि 141 च्या स्ट्राईक रेटने 503 रन केले, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर आयपीएल करियरमध्ये डिकॉकने 66 मॅचमध्ये 32 च्या सरासरीने 1,959 रन केले, यात एक शतक आणि 14 अर्धशतकं आहेत. क्वारंटाईन असल्यामुळे डिकॉक पहिला सामना खेळणार नाही. पोलार्डकडे 150 मॅचचा अनुभव वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कायरन पोलार्ड (Kieron Pollard) पहिल्यापासूनच मुंबईकडून खेळला आहे, त्याच्याकडे 150 पेक्षा जास्त आयपीएल सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने मागच्या मोसमात 16 मॅच खेळून 268 रन केले आणि 4 विकेटही घेतल्या. मागच्या वर्षी पोलार्डचा स्ट्राईक रेट 191 होता, त्यामुळे मुंबईला मोठा स्कोअर करण्यात यश आलं. आयपीएल करियरमध्ये पोलार्डने 164 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 3,023 रन केले आहेत, यात 15 अर्धशतकं आहेत. याचसोबत त्याने 60 विकेटही घेतल्या आहेत. मुंबईला मागच्या मोसमात चॅम्पियन बनवण्यात न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) मोलाचं योगदान दिलं. मागच्यावर्षी 15 मॅचमध्ये बोल्टने 25 विकेट घेतल्या. आयपीएल करियरमध्ये बोल्टने 48 मॅच खेळून 63 विकेट घेण्यात यश मिळवलं. दुसरीकडे मुंबईने या मोसमात न्यूझीलंडच्याच जेम्स नीशमलाही (James Neesham) टीममध्ये घेतलं आहे. मागच्या मोसमात पंजाबकडून खेळणाऱ्या नीशमला 5 सामन्यांमध्येच संधी मिळाली होती, पण त्याला चमक दाखवता आली नाही. नीशमचं टी-20 रेकॉर्ड मात्र चांगलं आहे. 143 टी-20 मॅचमध्ये नीशमने 2001 रन करून 132 विकेट घेतल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published: