• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूमध्ये रवी शास्त्रींना दिसतेय एबी डिव्हिलियर्सची झलक

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूमध्ये रवी शास्त्रींना दिसतेय एबी डिव्हिलियर्सची झलक

आयपीएलच्या (IPL 2021) 14व्या मोसमाची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यातल्या मॅचने होत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची नजर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) असणार आहे. रवी शास्त्री यांनी मुंबई-बँगलोर मॅचआधी सूर्यकुमार यादवची तुलना एबी डिव्हिलियर्सशी (Ab De Villiers) केली आहे.

 • Share this:
  चेन्नई, 9 एप्रिल : जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला (IPL 2021) सुरूवात झाली आहे. पुढचे दोन महिने क्रिकेट रसिकांना रोमांचक सामन्यांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. 14व्या मोसमाची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यातल्या मॅचने होत आहे. या दोन्ही टीममध्ये दिग्गज क्रिकेटपटूंची फौज आहे, जे एक हाती मॅचचा निकाल पलटवू शकतात. पण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची नजर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) असणार आहे. रवी शास्त्री यांनी मुंबई-बँगलोर मॅचआधी सूर्यकुमार यादवची तुलना एबी डिव्हिलियर्सशी (Ab De Villiers) केली आहे. फॅनकोडशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, जर एबी 360 डिग्री प्लेयर आहे, तर सूर्यकुमार यादवही कमी नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतंच स्वत:ला सिद्ध केलं आहे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास तगडा असेल. हा आत्मविश्वास त्याला आयपीएल 2021 मध्ये कामाला येईल. सूर्यकुमार यादवचं लक्ष्य टी-20 वर्ल्ड कपवरही असेल. जर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये आणि अंतिम 11 मध्ये जागा मिळेल. 'सूर्यकुमार यादव वेगळ्याप्रकारचा बॅट्समन आहे. त्याच्याकडे मैदानाच्या चारही बाजूंचे शॉट आहेत. जर तो टिकून राहिला तर बॉलरसमोर अडचणी निर्माण होतात,' असं शास्त्री म्हणाले. याचसोबत त्यांनी मुंबई इंडियन्सच्याच इशान किशनचं (Ishan Kishan) कौतुक केलं. इशान किशन निडर खेळाडू आहे, डिकॉक नसेल तर तो मुंबईला चांगली सुरूवात करून देईल, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला. आयपीएल 2020 मध्ये इशान किशन मुंबईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. ओपनर म्हणून इशानने 101 च्या सरसारीने रन केले होते, यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. याचसोबत त्याचा स्ट्राईक रेटही 145 च्या आसपास होता. चेन्नईच्या खेळपट्टीवर स्पिनरना मदत होत असली, तरी पहिल्या सामन्यात खेळपट्टी बॅट्समनना साथ देईल, असं शास्त्रींना वाटत आहे.
  Published by:Shreyas
  First published: