मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अफगाणिस्तानात तालिबान्यांचं थैमान; राशिद खान आणि नबी आहेत कुठे? चाहत्यांना पडलाय प्रश्न

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं थैमान; राशिद खान आणि नबी आहेत कुठे? चाहत्यांना पडलाय प्रश्न

आयपीएल स्पर्धा येत्या रविवारपासून (19 सप्टेंबर 2021) यूएईत सुरू होत आहे. क्रीडाप्रेमींना राशिद खान आणि मोहम्मद नबी कुठे आहेत हा प्रश्न पडला आहे.

आयपीएल स्पर्धा येत्या रविवारपासून (19 सप्टेंबर 2021) यूएईत सुरू होत आहे. क्रीडाप्रेमींना राशिद खान आणि मोहम्मद नबी कुठे आहेत हा प्रश्न पडला आहे.

आयपीएल स्पर्धा येत्या रविवारपासून (19 सप्टेंबर 2021) यूएईत सुरू होत आहे. क्रीडाप्रेमींना राशिद खान आणि मोहम्मद नबी कुठे आहेत हा प्रश्न पडला आहे.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या (Indian Premier League T-20 Cricket) जाहिराती टीव्हीवर दिसू लागल्या आहेत. क्रिकेटचा फीव्हर हळूहळू चढू लागला आहे. सर्वच टीम्स जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळी आयपीएल रसिकांना एक मोठा प्रश्न पडला आहे तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) टीममधून खेळणारे अफगाणिस्तानातील क्रिकेटपटू राशीद खान आणि मोहम्मद नबी (Rashid Khan, Mohammed Nabi) हे सध्या कुठं आहेत? अफगाणिस्तानात दहशतवादी संघटना तालिबानने अंतरिम सरकार स्थापन करून शरियत कायदा लागू केला आहे. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी तिथले नागरिक धडपडत होते. काबूलमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत, महिलांच्या हत्या केल्या जात आहेत. अशा भयग्रस्त वातावरणात आपले लाडके क्रिकेटपटू कुठे आहेत असं चाहत्यांना वाटत होतं. पण हैदराबाद फ्रँचायझीच्या व्यवस्थापकांनी याबद्दल उत्तर दिलं आहे.

    पाकिस्तान महिला बॉलरने जादुई बॉल टाकून शेन वॉर्नची दाखवली झलक, VIDEO पाहून क्रिकेटप्रेमी झाले अवाक्

    आयपीएल स्पर्धा येत्या रविवारपासून (19 सप्टेंबर 2021) यूएईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) कँपमध्ये पोहोचले आहेत अशी माहिती हैदराबादच्या अधिकाऱ्यांनी ANI वृत्तसंस्थेला दिली आहे. हे अधिकारी म्हणाले, ‘अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशीद खान आणि मोहम्मद नबी हे दोघेही यूएईत पोहोचले असून सध्या क्वारंटाइनमध्ये (Quarantine) आहेत. ते प्रोफेशन खेळाडू आहेतच पण त्यांच्या कुटुंबाची टीमच्या वतीने स्पर्धा सुरू असेपर्यंत काळजी घेतली जाईल. त्यांची मानसिकता उत्तम राहील आणि ते मैदानात आपला सर्वोत्तम खेळ करून दाखवतील यासाठी जे जे आवश्यक आहे ते हैदराबाद संघाचं प्रशासन करेल म्हणजेच त्यांची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ. Crickenmore ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    राशीद आणि नबी या दोघांनी गेल्या काही वर्षांपासून हैदराबाद संघासाठी सर्वोत्कृष्ट कामिरी करून दाखवली आहे. या टीममील प्रमुख खेळाडू अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. आता आयपीएल 2021 च्या उर्वरित भागतही ते अशीच कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान मे 2021 मध्ये आयपीएल टी-20 क्रिकेट (IPL T-20 Cricket) स्पर्धा खेळवली गेली होती पण खेळाडूंना कोविड-19 विषाणूची लागण झाल्यामुळे ती स्पर्धा मध्येच थांबवण्यात आली आणि आता ती पुन्हा खेळवली जात आहे. आता कोणती टीम आयपीएल 2021 स्पर्धा जिकते याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

    First published:
    top videos