Home /News /sport /

IPL 2021 : फास्ट बॉलर टी नटराजनचा हॉस्पिटलमधून खास मेसेज, म्हणाला...

IPL 2021 : फास्ट बॉलर टी नटराजनचा हॉस्पिटलमधून खास मेसेज, म्हणाला...

टीम इंडियाचा फास्ट बॉलर टी नटराजन (T Natrajan) याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजन आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमातून बाहेर झाला.

  मुंबई, 27 एप्रिल : टीम इंडियाचा फास्ट बॉलर टी नटराजन (T Natrajan) याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजन आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमातून बाहेर झाला. नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच ही दुखापत झाली होती. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या नटराजनने मागच्याच आठवड्यात माघार घेतली होती. या शस्त्रक्रियेनंतर त्याने बीसीसीआय आणि मेडिकल टीमचे आभार मानले. टी नटरजान ट्वीट करत म्हणाला, 'आज माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. माझी काळजी घेणारी मेडिकल टीम, सर्जन, डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार. मी बीसीसीआय आणि मला शुभेच्छा देणाऱ्यांचेही आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होऊन मैदानात पुनरागमन करेन.' 30 वर्षांचा नटराजन आयपीएलच्या या मोसमात हैदराबादकडून फक्त दोन सामने खेळला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नटराजनची दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही.
  ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर नटराजन एनसीएमध्ये उपचारांसाठी गेला होता. इंग्लंडविरुद्धच्या मॅचसाठी त्याला फिट घोषित करण्यात आलं होतं, पण तो या सीरिजसाठी तयार नव्हता. आयपीएलच्या मागच्या मोसमातल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर नटराजन चर्चेत आला होता. मागच्या आयपीएलमध्ये नटराजनने यॉर्कर टाकले होते, पण तरीही त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती, पण वरुण चक्रवर्तीला दुखापत झाल्यामुळे नटराजनला अखेरच्या क्षणी संधी देण्यात आली. नटराजननेही ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. भारतात परतल्यानंतर नटराजनने त्याच्या दुखापतीबाबत खुलासा केला नव्हता. डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या नटराजनने 44 टी-20 सामन्यांमध्ये 44 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 7.50 चा असून सरासरी 27 आहे. आंतराराष्ट्रीय टी-20 मध्ये नटराजनने 4 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या. 21 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 67 विकेट आणि 17 लिस्ट ए सामन्यांत त्याला 19 विकेट मिळाल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Cricket, IPL 2021, SRH

  पुढील बातम्या