Home /News /sport /

IPL स्थगित झाल्यानंतर शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IPL स्थगित झाल्यानंतर शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आयपीएल (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    लाहोर, 5 मे : आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. केकेआरचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), संदीप वॉरियर (Sandeep Warrior) तसंच दिल्लीचा अमित मिश्रा (Amit Mishra), हैदराबादचा ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. चेन्नई सुपरकिंग्सचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि प्रशिक्षक माईक हसी (Mike Hussey) यांनाही कोरोनाची लागण झाली, त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल आधीच रद्द करायला पाहिजे होती, असं शोएब अख्तर म्हणाला आहे. 'भारतात प्रत्येक दिवसाला 4-5 लाख रुग्ण सापडत आहेत. हजारो लोकांचा मृत्यू होत आहे, अशा परिस्थितीमध्ये आयपीएल होऊ शकत नाही. खेळ तमाशा होऊ शकत नाही. लोकं 2008 पासून पैसे कमवत आहेत. एक वर्ष पैसे कमवले नाही, तर काही अडचण येणार नाही. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. आम्ही पीएसएलसाठी बायो-बबल बनवलं, ते पूर्णपणे फ्लॉप झालं, भारताने बनवलेलंल बायो-बबलही फ्लॉपच ठरलं,' असं शोएब त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला. यावेळी लोकांचा जीव वाचवण्यापेक्षा जास्त काहीही असू शकत नाही. मी आठवडा आधीही हेच बोललो होतो. अखेर आता बीसीसीआयने आयपीएल स्थगित केली, असं वक्तव्य शोएबने केलं. आयपीएल स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला जवळपास 2200 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. स्पर्धेची फायनल 30 मे रोजी अहमदाबादमध्ये होणार होती, पण 24 दिवस आणि 29 मॅचनंतर स्पर्धा स्थगित करावी लागली. या वर्षात वेळ मिळाला, तर आयपीएलचं पुन्हा आयोजन करू, पण सध्या तशी परिस्थिती नाही, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020 चं यशस्वी आयोजन युएईमध्ये करण्यात आलं होतं. भारतामध्ये सध्या दिवसाला कोरोनाचे तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत, तर तीन हजारांपेक्षा जास्त जणांचा रोज कोरोनामुळे मृत्यू होत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, IPL 2021, Shoaib akhtar

    पुढील बातम्या