IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतर BCCI ला आणखी एक धक्का, झालं मोठं नुकसान

IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतर BCCI ला आणखी एक धक्का, झालं मोठं नुकसान

आयपीएल 2021 (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर आता बीसीसीआयच्या (BCCI) नुकसानीची नवी माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर आता बीसीसीआयच्या (BCCI) नुकसानीची नवी माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या एका मोसमातून बीसीसीआयला जवळपास 4 हजार कोटी रुपयांची कमाई होते, पण यंदा 60 पैकी फक्त 29 मॅच झाल्यानंत आयपीएल स्थगित करण्यात आली, त्यामुळे बोर्डाचं 2,500 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं.

बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल स्थगित केल्यामुळे आमचं 2 हजार ते अडीच हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 52 दिवस चालणारी ही स्पर्धा 30 मेपर्यंत खेळवली जाणार होती. 31 मॅच आणखी होणार होत्या, पण आता हे सामने होणार नसल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान ब्रॉडकास्टिंग महसुलातून होणार आहे. मागच्या मोसमापासून प्रेक्षकांशिवाय सामने खेळवले गेले आहेत, त्यामुळे तिकीटातून मिळणारा महसूलही बुडाला आहे. हे नुकसान बोर्ड आणि फ्रॅन्चायजींचं झालं आहे.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने (Star Sports) पाच वर्षांसाठी 16,347 कोटी रुपयांचा करार केला होता. म्हणजेच प्रत्येक मॅचसाठी स्टार बीसीसीआयला 54.5 कोटी रुपये देणार होतं. 29 मॅच खेळवल्या गेल्यामुळे स्टार बीसीसीआयला 1,580 कोटी रुपये देणार आहे, पण 31 सामन्यांचे 1690 कोटी रुपये मिळणार नाहीत. याशिवाय टायटल स्पॉन्सरकडून बीसीसीआयला 440 कोटी रुपये मिळतात, पण हीच रक्कम आता 220 कोटी रुपय इतकी असेल. याशिवाय इतर स्पॉन्सरकडून मिळणारी रक्कमही कमी होणार आहे. बीसीसीआय या कमाईचा हिस्सा फ्रॅन्चायजींनाही देतं, त्यामुळे फ्रॅन्चायजींनाही यंदा कमी रक्कम मिळेल.

Published by: Shreyas
First published: May 4, 2021, 10:17 PM IST

ताज्या बातम्या