मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : Sunrisers Hyderabad मधून डेव्हिड वॉर्नरचा अस्त? क्रिकेटपटूनं स्वत: केला खुलासा

IPL 2021 : Sunrisers Hyderabad मधून डेव्हिड वॉर्नरचा अस्त? क्रिकेटपटूनं स्वत: केला खुलासा

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाच वेळा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad Latest Match Update) या टीमचं नेतृत्व केलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner News) या टीममधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाच वेळा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad Latest Match Update) या टीमचं नेतृत्व केलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner News) या टीममधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाच वेळा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad Latest Match Update) या टीमचं नेतृत्व केलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner News) या टीममधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे

    मुंबई, 28 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाच वेळा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad Latest Match Update) या टीमचं नेतृत्व केलेला डेव्हिड वॉर्नर (David Warner News) या टीममधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या मॅचनंतर इन्स्टाग्रामवर (David Warner on Instagram) एका चाहत्याला त्याने दिलेल्या उत्तरातून तसे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

    उत्तम रन्स केल्यामुळे डेव्हिड वॉर्नरला आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन वेळा ऑरेंज कॅप मिळाली आहे; मात्र यंदाच्या म्हणजेच आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये मात्र त्याच्या खेळाचा रंग उडाला आहे. 2021च्या आयपीएल हंगामाची सुरुवातही त्याने सनरायझर्स हैदराबाद टीमचा कॅप्टन म्हणूनच केली. या टीमचा कॅप्टन बनण्याची ही त्याची पाचवी वेळ होती; मात्र यंदाच्या पहिल्या सहापैकी केवळ एकच मॅच जिंकू शकल्याने टीम मॅनेजमेंटने त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेतली. त्यानंतर केन विल्यम्सनकडे सनरायझर्स हैदराबाद या टीमचं नेतृत्व देण्यात आलं. एवढंच नव्हे, तर नंतर लवकरच त्याला 11 खेळाडूंमधूनही बाहेर काढून राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं.

    IPL 2021, MI vs PBKS: मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट, आज 'करो या मरो'ची स्थिती

    आयपीएल 2021चं दुसरं पर्व संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE IPL 2021) सुरू झालं. जॉनी बेअरस्टोला बाहेर ठेवलं, तेव्हा वॉर्नरला टीममध्ये घेण्यात आलं; मात्र तेव्हा तो केवळ 2 रन्सच करू शकला. तेव्हापासून त्याला बाहेरच बसवण्यात आलं असून, तो हॉटेलच्या खोलीत बसून मॅचेस पाहतो आहे. या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये सनरायझर्स हैदराबाद टीमला आतापर्यंत केवळ दोनच विजय नोंदवता आले आहेत.

    सनरायझर्स हैदराबाद टीमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टवर एका फॅनने वॉर्नरबद्दलचा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना वॉर्नरने आपला या टीमसोबतचा प्रवास संपल्याचे संकेत दिले. Asvika_Adhish या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असा प्रश्न विचारण्यात आला होता, की 'वॉर्नर स्टेडियममध्ये आहे का? आम्हाला तो दिसला नाही!' (Is Warner in the stadium? We didn't spot him?!)

    त्यावर उत्तर देताना वॉर्नरने असं लिहिलं आहे, की 'दुर्दैवाने पुन्हा नाही; पण तुमचं मला असलेलं पाठबळ असंच कायम राहू द्या.' (unfortunately won't be again. But keep supporting please). वॉर्नरच्या उत्तरावरून तो पुन्हा स्टेडियममध्ये दिसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच, कदाचित तो टीमलाही रामराम ठोकणार असल्याचे संकेत यातून मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.

    सनरायझर्स टीमचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी वॉर्नरला हॉटेल रूममध्येच ठेवण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही आता फायनलपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तरुण खेळाडूंना केवळ मॅचेसचा अनुभव नव्हे, तर ग्राउंडवर वेळही मिळावा, म्हणून आम्ही या वेळच्या मॅचवेळी असा निर्णय घेतला. हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या अनुभवी खेळाडूंपैकी वॉर्नर हा एकमेव खेळाडू नाही. (त्यात केदार जाधव आणि शाबाझ नदीम यांचाही समावेश आहे.) आमच्या टीममध्ये असे अनेक तरुण खेळाडू आहेत, की जे ग्राउंडवरही गेले नाहीत, अगदी राखीव खेळाडू म्हणूनही गेलेले नाहीत. म्हणून आम्ही त्यांना तो अनुभव घेण्याची संधी देण्याचं ठरवलं. पुढच्या काही मॅचेसमध्येही हे लागू राहू शकेल. तरीही याबद्दल नेमकं माहिती नाही.'

    प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 4 टीम्स एकमेकांना भिडणार; IPL मधील चुरस वाढली

    वॉर्नरच्या भविष्याबद्दलचा निर्णय नंतर घेतला जाणार असल्याचंही बेलिस यांनी सांगितलं. 'त्याबद्दल काही चर्चा झालेली नाही. महत्त्वाच्या लिलावापूर्वीचं हे अखेरचं वर्ष आहे. ते निर्णय नंतर घेतले जातील. वॉर्नरने अनेक वर्षं सनरायझर्स हैदराबाद टीमसाठी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्याने उत्तम रन्स केलेल्या आहेत. तो आयपीएलमध्ये अजूनही कित्येक रन्स करील.'

    सनरायझर्स हैदराबाद टीम यंदा गुणतालिकेत शेवटी असून, 9पैकी दोनच मॅचेस त्यांना जिंकता आल्या आहेत. त्यामुळे ती टीम जवळपास यंदाच्या टुर्नामेंटमधून जवळपास बाहेर फेकली गेल्यासारखंच आहे.

    First published:
    top videos

      Tags: David warner, IPL 2021, SRH, Sunrisers hyderabad