मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएल खेळणार का? SRH नं दिलं उत्तर

IPL 2021 : अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएल खेळणार का? SRH नं दिलं उत्तर

अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थिती पाहाता राशिद खान (Rashid Khan) आणि मोहम्मद नबी (Mohammad Nabi) स्पटेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021) खेळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट : अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थिती पाहाता राशिद खान (Rashid Khan) आणि मोहम्मद नबी (Mohammad Nabi) स्पटेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021) खेळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानवर सध्या तालिबानी दहशतवाद्यांचा ताबा आहे. देशातील परिस्थितीचा या खेळाडूंच्या सहभागावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यावेळी त्यांची आयपीएल टीम असलेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांनी याबबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

सनरायझर्सचे सीईओ शनमुगम यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'आम्ही या विषयावर अद्याप चर्चा केलेली नाही. पण ते दोघंही आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात खेळतील. आमची टीम 31 ऑगस्ट रोजी यूएईला रवाना होईल.' इंग्लंडचा कॅप्टन केविन पीटरसन याने दिलेल्या माहितीनुसार राशिद खानला सध्या त्याच्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. कारण, काबूलमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्यानं त्याला कुंटुंबाला अद्याप अफगाणिस्तानच्या बाहेर काढता आलेलं नाही.

राशिद खान आणि मोहम्मद नबी या अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या सहभागावर प्रश्न उपस्थित झाला आहे. हे दोघंही सध्या इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड' ही क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. राशिद ट्रेंट रॉकेट्सचं तर नबी लंडन स्पिरिट्स या टीमचं प्रतिनिधित्व करत आहे.

IND vs ENG : इंग्लंडला नाही विजयाची खात्री, दिग्गज क्रिकेटपटूला वाटतेय 'ही' भीती

द हंड्रेड स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी संपणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर राशिद आणि नबी घरी परतणार की इंग्लंडमध्येच थांबतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. ते इंग्लंडमध्येच थांबले तर बीसीसीआय त्यांची विशेष विमानानं यूएईमध्ये येण्याची व्यवस्था करु शकते. टीम इंडिया 15 स्पटेंबर रोजी यूएईला रवाना होणार आहे. त्यांच्यासोबत हे खेळाडू यूएईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, IPL 2021, SRH, Taliban