IPL 2021 : आयपीएल लिलाव, खेळाडूंसाठी कडक नियम, अशी असणार प्रक्रिया

IPL 2021 : आयपीएल लिलाव, खेळाडूंसाठी कडक नियम, अशी असणार प्रक्रिया

आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठीचा लिलाव लवकरच होणार आहे. यंदाच्या वर्षीच्या लिलावासाठी बीसीसीआय (BCCI)ने खेळाडूंसाठी नियम आणखी कडक केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी : आयपीएलच्या (IPL 2021) 14 व्या मोसमासाठीचा लिलाव लवकरच होणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार 16 फेब्रुवारीला हा मिनी ऑक्शन होईल. या लिलावासाठी खेळाडूंना 4 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी लागणार आहे. यंदाच्या वर्षीच्या लिलावासाठी बीसीसीआय (BCCI)ने खेळाडूंसाठी नियम आणखी कडक केले आहेत. जर एखाद्या खेळाडूला वैयक्तिकरित्य लिलावात सहभागी व्हायचं असेल, तर त्याला राज्य संघाशी बोलावं लागणार आहे. यासाठी खेळाडूचा एजंट किंवा मॅनेजरला संपर्क करता येणार नाहीये.

तर दुसरीकडे, सगळ्या 8 टीमना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी 20 जानेवारीपर्यंत द्यावी लागणार आहे. ज्या खेळाडूंसोबत करार झाला नाही, त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करता येईल. तसंच ज्या खेळाडूंना लिलावात सहभागी करायचं आहे, त्यांची नावं सगळी औपचारिकता पूर्ण करून पाठवण्यात यावीत, असं बीसीसीआयने राज्य संघांना सांगितलं आहे.

दुसरीकडे अंडर-19 आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंसाठीही नियम बनवण्यात आले आहेत. ज्या खेळाडूचं राज्य संघामध्ये रजिस्ट्रेशन असेल, असाच अंडर-19 खेळाडू लिलावात नाव नोंदणी करू शकतो. तसंच कमीत कमी एक फर्स्ट क्लास मॅच किंवा एक लिस्ट ए मॅच खेळणाऱ्या खेळाडूलाच लिलावात नाव नोंदण्याची संधी मिळेल. याशिवाय स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंनाही लिलावात सहभागी व्हायचं असेल, तर त्यांना निवृत्तीसंबंधित सगळी कागदपत्र दाखवावी लागणार आहेत.

Published by: Shreyas
First published: January 17, 2021, 12:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या