मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, RCB vs SRH : हैदराबाद अखेर जिंकली, बँगलोरच्या पराभवामुळे CSK खूश!

IPL 2021, RCB vs SRH : हैदराबाद अखेर जिंकली, बँगलोरच्या पराभवामुळे CSK खूश!

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या मोसमात अखेर हैदराबादच्या टीमला (SRH) विजय मिळाला आहे. बँगलोरविरुद्धचा (RCB vs SRH) सामना त्यांनी 4 रनने जिंकला आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या मोसमात अखेर हैदराबादच्या टीमला (SRH) विजय मिळाला आहे. बँगलोरविरुद्धचा (RCB vs SRH) सामना त्यांनी 4 रनने जिंकला आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या मोसमात अखेर हैदराबादच्या टीमला (SRH) विजय मिळाला आहे. बँगलोरविरुद्धचा (RCB vs SRH) सामना त्यांनी 4 रनने जिंकला आहे.

  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 6 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या मोसमात अखेर हैदराबादच्या टीमला (SRH) विजय मिळाला आहे. बँगलोरविरुद्धचा (RCB vs SRH) सामना त्यांनी 4 रनने जिंकला आहे. हैदराबादने दिलेलं 142 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 137 रनच करता आले. देवदत्त पडिक्कलने (Devdutt Padikkal) सर्वाधिक 41 रन केल्या, पण यासाठी त्याने 52 बॉल बॅटिंग केली. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 25 बॉलमध्ये 40 रनची आक्रमक खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, जेसन होल्डर, सिद्धार्थ कौल, उमरान अकमल आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीच्या बॉलरनी हैदराबादला 141 रनवर रोखलं. ओपनर जेसन रॉयने सर्वाधिक 44 रन केले, तर केन विलियमसन 29 रन करून आऊट झाला. बँगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर डॅनियल ख्रिश्चनला 2 विकेट घेण्यात यश आलं. जॉर्ज गार्टन आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

RCB चा पराभव CSK खूश

सनरायजर्स हैदराबादचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा विजय आहे. 13 सामन्यांपैकी त्यांनी तब्बल 10 मॅच गमावल्या. 6 पॉईंट्ससह ते अखेरच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर (IPL Points Table) आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं त्यांचं आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. आरसीबीची टीम आधीच प्ले-ऑफमध्ये (IPL Play Off) क्वालिफाय झाली असली तरी त्यांन मात्र या पराभवामुळे धक्का बसला आहे. 13 मॅचपैकी 8 मध्ये त्यांचा विजय झाला आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. 16 पॉईंट्ससह विराटची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या पराभवामुळे आरसीबीला टॉप-2 मध्ये येणं कठीण झालं आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचा यामुळे फायदा झाला आहे. शेवटच्या सामन्यात आरसीबीचा विजय झाला आणि चेन्नईचा पराभव झाला तरीदेखील नेट रनरेटमुळे चेन्नई दुसऱ्या आणि आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर राहिल. प्ले-ऑफमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या टीमना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात.

First published:

Tags: IPL 2021, RCB, SRH