Home /News /sport /

IPL 2021: मनिष पांडेनं मैदानात केलं बालिश वर्तन, सगळीकडे होतेय थू-थू

IPL 2021: मनिष पांडेनं मैदानात केलं बालिश वर्तन, सगळीकडे होतेय थू-थू

सनरायझर्स हैदराबादसाठी (SRH) ही आयपीएल स्पर्धा निराशाजनक ठरत आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध रविवारी झालेल्या मॅचमध्ये या हैदराबादची फिल्डिंग सुरू असताना मनिष पांडेनं (Manish Pandey) मैदानात बालिश वर्तन केलं

    मुंबई, 26 सप्टेंबर : सनरायझर्स हैदराबादसाठी (SRH) ही आयपीएल स्पर्धा निराशाजनक ठरत आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादला 126 रनचं माफ आव्हानही पार करता आलं नाही. जेसन होल्डरनं (Jason Holder) शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या आक्रमक खेळीनंतरही पंजाब किंग्ज विरुद्ध हैदराबादचा (PBKS vs SRH) 5 रननं पराभव झाला. हैदराबादची टीम पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आलं आहे. या मॅचमध्ये हैदराबादची फिल्डिंग सुरू असताना मनिष पांडेनं (Manish Pandey) मैदानात बालिश वर्तन केलं. भुवनेश्वर कुमारनं 20 व्या ओव्हरमध्ये मनिष पांडेनं पंजाबच्या नॅथन एलिसचा कॅच पकडला. हा कॅच घेतल्यानंतर आनंदात पांडेनं बॉलला किस केलं. त्यानंतर लगेच त्याला चूक लक्षात आली आणि तो मैदानातच थूंकू लागला. कोरोना व्हायरसमुळे बदललेल्या नियमानुसार बॉलला लाळ (saliva) लावण्याची परवानगी नाही. मनिषला कदाचित कोरोना व्हायरसची भीती सतावत असेल त्यामुळे त्यानं तातडीनं ही कृती केली. मात्र त्याची ही कृती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. हैदराबादच्या टीमला या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यांचा फास्ट बॉलर टी. नटराजनला (T. Natrajan) कोरोनाची लागण झाली आहे. तसंच त्याच्या संपर्कात असलेले 6 जण सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. हैदराबादचा पुन्हा पराभव पंजाब किंग्ज विरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादच्या फॅन्सना पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागली. पंजाबचा कर्णधार के एल राहुल (21 ) आणि एडन मार्कराम (27) या दोघांच्या व्यतिरिक्त पंजाबचे शेर सनरायजर्स विरूद्ध ढेर झाले. त्यामुळे हैदराबादसमोर विजयासाठी 126 रनचं आव्हान होतं. IPL 2021, Points Table: पंजाबच्या विजयाचा मुंबईला फटका, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल हैदराबादला हे आव्हान पेलवलं नाही. डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) या हैदराबादच्या अनुभवी बॅट्समननं निराशा केली. या दोघांनाही मोहम्मद शमीनं झटपट आऊट केलं. सुरुवातीला मिळालेल्या दोन धक्क्यानंतर हैदराबादची टीम सावरलीच नाही. त्यानंतर पंजाबचा लेगस्पिनर रवी बिश्नोईनं तीन विकेट्स घेत हैदराबादला आणखी अडचणीत आणलं. जेसन होल्डरनं शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमक फटकेबाजी केली. त्यानं 29 बॉलमध्ये 5 सिक्सच्या मदतीनं नाबाद 47 रन काढले. पण त्याला अन्य खेळाडूंची साथ मिळाली नाही. पंजाबच्या बॉलर्सनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत हैदराबादवर 5 रननं निसटता विजय मिळवला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, SRH

    पुढील बातम्या