• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • MI vs SRH; मुंबई इंडियन्सकडून या हंगामात पहिल्यांदाच खेळणार 'हा' खेळाडू

MI vs SRH; मुंबई इंडियन्सकडून या हंगामात पहिल्यांदाच खेळणार 'हा' खेळाडू

आयपीएल २०२१ च्या (IPL2021) 56व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात(srh VS mi) लढत होणार आहे. मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्टेडियमवर केन विल्यमसनऐवजी मनीष पांडे हैदराबादचे नेतृत्व करताना दिसत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: आयपीएल २०२१ लीगच्या (IPL2021) 56व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात(srh VS mi) अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर लढत होणार आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, स्टेडियमवर केन विल्यमसन(Kane Williamson)ऐवजी मनीष पांडे (Manish Pandey)हैदराबादचे नेतृत्व करताना दिसत आहे. या सामन्यासाठी मनिष पांडे सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे. संघाचा नियमित कर्णधार विलियम्सनच्या कोपराला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर भूवनेश्वर कुमारला देखील छोटी दुखापत आहे. अशी माहिती मनिष पांडेने दिली आहे. तर, प्लेइंग इलेवनमध्ये दोन बदल केले असल्याची माहिती रोहित शर्माने दिली आहे. कृणाल पांड्या आणि पियुष चावला या दोघांना संधी दिली आहे. सौरभ तिवारी आणि जयंत यादव यांना वगळण्यात आले आहे.

  असे आहेत ११ जणांचे संघ

  मुंबई इंडियन्स

  रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, जिमी निशाम, नॅथन कूल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, ट्रेंट बोल्ट.

  सनरायझर्स हैदराबाद

  जेसन रॉय, अभिषेक शर्मा, मनीष पांडे (कर्णधार), प्रियम गर्ग, अब्दुल समद, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद नबी, उम्रान मलिक, सिद्धार्थ कौल.
  Published by:Dhanshri Otari
  First published: