Home /News /sport /

IPL 2021 : 699 दिवसानंतर टीम इंडियाचा हा खेळाडू मैदानात, KKR कडून पदार्पण

IPL 2021 : 699 दिवसानंतर टीम इंडियाचा हा खेळाडू मैदानात, KKR कडून पदार्पण

आयपीएलच्या (IPL 2021) रविवारच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. या सामन्यातून कोलकात्याकडून (KKR) हरभजन सिंगने (Harbhajan Singh) पदार्पण केलं.

पुढे वाचा ...
    चेन्नई, 11 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) रविवारच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने त्यांच्या टीममध्ये वॉर्नरसह जॉनी बेयरस्टो, राशिद खान आणि मोहम्मद नबी या परदेशी खेळाडूंना संधी दिली. तर कोलकात्याने (KKR) इयन मॉर्गन, शाकीब अल हसन, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स या परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवलं आहे. कोलकात्याकडून या मॅचमधून टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही पदार्पण केलं आहे. तब्बल 699 दिवसानंतर हरभजन सिंग व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. याआधी हरभजनने 12 मे 2019 साली आयपीएलची फायनल खेळली होती. त्यावेळी हरभजन चेन्नई सुपरकिंग्सच्या (CSK) टीममध्ये होता. आयपीएलचा मागचा हंगाम कोरोना व्हायरसमुळे युएईमध्ये खेळवला गेला, पण वैयक्तिक कारणांमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर यावर्षाच्या लिलावाआधी चेन्नईने हरभजनला सोडून दिलं. लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने हरभजन सिंगला 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत पाचव्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे. हरभजन सिंग हा आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ मुंबईकडूनच खेळला. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 150 विकेट आहेत. या लीगमध्ये त्याने एकदा 5 विकेटही घेतल्या आहेत. हरभजन सिंग भारताकडून शेवटचा सामना 2016 साली खेळला होता. हरभजनने टेस्ट क्रिकेटमध्ये 417, वनडेमध्ये 269 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 विकेट घेतल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Harbhajan singh, IPL 2021, KKR, SRH

    पुढील बातम्या