चेन्नई, 25 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) पहिल्या सुपर ओव्हरमध्ये (Super Over) दिल्लीने हैदराबादचा (DC vs SRH) पराभव केला आहे. सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने दिल्लीला 8 रनचं आव्हान दिलं होतं, हे आव्हान शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी पूर्ण केलं. हैदराबादने या 8 रन रोखायला राशिद खानला बॉलिंग दिली, पण ऋषभ पंतने तिसऱ्या बॉलला फोर मारून दिल्लीचा विजय सोपा केला. त्याआधी दिल्लीकडून अक्षर पटेलने सुपर ओव्हर टाकली. डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियमसन यांना अचूक बॉलिंग करत अक्षरने फक्त 7 रनच दिले.
दिल्लीने दिलेलं 161 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 160 रनच करता आल्या. केन विलियमसनने 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले, हैदराबादच्या दुसऱ्या बॅट्समनना या आव्हानाचा पाठलाग करताना अपयश आलं, पण आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या जगदिशा सुचितने धमाकेदार कामगिरी केली. सुचितने 6 बॉलमध्ये नाबाद 14 रन केले, यामध्ये 2 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला विजयासाठी 16 रनची गरज होती, पण रबाडाने 15 रनच दिले, ज्यामुळे मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. दिल्लीकडून आवेश खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलला 2 आणि अमित मिश्राला 1 विकेट मिळाली.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या 81 रनच्या पार्टनरशीपमुळे दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादविरुद्ध (DC vs SRH) समाधानकारक कामगिरी केली आहे. हा सामना जिंकण्यासाठी हैदराबादला 160 रनचं आव्हान मिळालं आहे. पृथ्वी शॉने 39 बॉलमध्ये 53 रन केले, तर कर्णधार ऋषभ पंतने 37 आणि स्टीव्ह स्मिथने नाबाद 34 रन केले. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने 2 आणि राशिद खानने 1 विकेट घेतली. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. कोरोनातून बरा झालेल्या अक्षर पटेलचं (Axar Patel) दिल्लीच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तर हैदराबादने दुखापत झालेल्या भुवनेश्वर कुमारऐवजी (Bhuvneshwar Kumar) जगदीश सुचितला संधी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021, SRH